SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हातगाड्यावर मक्याचे कणीस विकणाऱ्या आजीबाईंकडून तंत्रज्ञानाचा भन्नाट वापर; थेट माजी क्रिकेटपटूने घेतली दखल!

आपल्या देशात कोण काय जुगाड करेल सांगता येत नाही. वय कोणतेही असो, तंत्रज्ञान आणि मानवी कल्पनाशक्ती यांचा मेळ जमला की आयुष्याचा खेळ सोपा होतो.

बंगळुरू मधील वेल्लमा नावाच्या 75 वर्षीय आजीबाईंचा मक्याचे कणीस विकण्याचा व्यवसाय आहे. बंगळुरू विधानसभेबाहेर त्यांचा गाडा लागतो. मक्याचे कणीस भाजयचे म्हणजे त्या आहारातील कोळश्याला हवा द्यायला हवी.

Advertisement

सतत हवा देऊन हात दुखू नयेत म्हणून त्यांनी जी शक्कल लढवली आहे त्याला तोड नाही. आपल्या गाड्यावर त्यांनी चक्क सौरऊर्जेवर चालणारा पंखा लावला आहे. या पंख्याचे तोंड कोळश्याच्या दिशेने केले आहे.

जसे जसे ऊन वाढते सौरऊर्जेवर तो पंखा फिरतो. कोळसा फुलतो आणि कणीस सहज भाजले जातात. त्यांची ही शक्कल माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मण याला खूप आवडली. त्याने त्याच्या ट्विटर वरून त्या आजींचा नावसाहित फोटो शेअर केला. तंत्रज्ञानाचा वापर आपले काम किती सहज करू शकतो; याचे हे उत्तम उदाहरण वेल्लमा यांच्याकडे पाहून कळते, असे या फोटोला कॅप्शन सुद्धा त्याने दिले.

Advertisement

सगळीकडे त्यांच्यावर स्तुतीचा वर्षाव होत आहे आणि त्यांना ओळख दिल्याबद्दल सगळे लक्ष्मणचे आभार मानत आहेत. वय, शिक्षण, ज्ञान यापलीकडे जाऊन कल्पनाशक्ती आणि नवे शिकण्याची उमेद माणसाला जे काही तो करतो त्यात नावीन्य आणि यश शोधण्याची ताकद देते, ही गोष्ट या आजीबाईंकडून शिकण्यासारखी आहे.

➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement