SpreadIt News | Digital Newspaper

घरबसल्या कमवू शकता लाखो रूपये, घराच्या छताचा ‘असा’ करा पुरेपूर वापर..

0

आपल्याकडे दुसरा प्लॉट किंवा जागा असेल तर ती आपण भाड्याने देतो. हा झाला पारंपरिक मार्ग, परंतु यापलिकडेही उत्पन्नाचे स्त्रोत असू शकतात. सध्या कोरोनाच्या काळात सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत किंवा त्याचा दूरगामी परिणाम तरी झालाय, अशा स्थितीत तुम्हाला घरबसल्या कमावून देईल.

आता तुम्ही म्हणाल, घराचे छत (टेरेस) कसे काय पैसे कमावून देईल, तर गोष्ट अशी आहे की सरकारही त्यासाठी मदत करते. तुमच्याकडे त्यासाठी थोडी कल्पनाशक्ती हवी आणि धडपड करण्याची शक्ती. नेमकं छत कसं कमावून देवू शकतं ते पाहू…

Advertisement

▪️ मोबाईल टॉवर

सगळ्यात सोपा आणि सरळ उपाय म्हणजे टेरेसवर मोबाईल मनोरा लावायचा. बाकी काही झंझटच नाही. आता प्रत्येकालाच मोबाईल टॉवर मिळणार नाही, हे नक्की! त्यासाठी तु्म्ही टेलिकॉम कंपनीच्या कार्यालयात गेलं पाहिजे. तेथून तुम्हाला खरी माहिती मिळेल. एकदा टॉवर लावला की पैसाच पैसा. कारण याचे रेंट किमान 30 हजार ते 3 लाख असू असते. त्यासाठी महापालिकेकडील ना हरकत प्रमाणपत्र वगैरेसारखे सोपस्कार पूर्ण करावे लागतील.

Advertisement

▪️ सोलर प्लांट

सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात विजेचा तुटवडा आहे. त्यामुळे सरकार सौर प्रकल्प उभारण्यासाठी मदत करते. या प्रोजेक्टसाठी आपण आपल्या घराचे रिकामे छत भाड्याने घेऊ शकतो. आपल्यालाही हा सेट बसवून वीज तयार करता येईल. तयार झालेली वीज सरकार तसेच खासगी कंपनी विकत घेते. युनिटप्रमाणे त्याचे दर ठरलेले असतात. तो कारभार पारदर्शक असतो. या प्रकल्पासाठी सरकार तुम्हाला सबसीडीही देते.

Advertisement

▪️ सेंद्रिय शेती

सध्या टेरेसचा वापर गार्डन म्हणूनही केला जातो. आपण गावाकडे जाऊन शेती करू शकत नाही, तर टेरेस गार्डनही फुलवू शकता. तेथे भाजीपाल्यासह फळेही उत्पादित होत आहेत. एकेका कॅरेटमध्ये आठवड्याचा भाजीपाला निघतो. तु्म्ही तो घरी वापरू शकता किंवा विकूही शकता. कारण सध्या सेंद्रीय भाजीपाल्याला खूप मागणी आहे. विषमुक्त भाजीपाला मिळत असेल तर त्याला दरही चांगला मिळतो. घरच्या घरी शेती करून टेरेस तुम्हाला पैसे कमावून देईल.

Advertisement

▪️ गृहोद्योग

सध्या होम मेड वस्तूंना व खाद्यपदार्थांना खूप मोठी मागणी आहे. ज्या महिलांना हा उद्योग करायची हौस असते. त्यांच्याकडे जागेचा प्रश्न निर्माण होतो. इतर ठिकाणी जागा भाड्याने घ्यायची झाल्यास तिचे रेंट त्यांना परवडत नाही. त्यामुळे आपण अशा महिलांना कमी रेंटमध्ये आपले रिकामे छत उपलब्ध करून देऊ शकतो किंवा आपणही असा उद्योग सुरू करू शकतो. यासोबत छोट्या-मोठ्या क्लाससाठी जागा देऊ शकतो. जसे की, चित्रकला वर्ग, उन्हाळी काम किंवा रेसिपीसाठी एखादा क्लासही काढू शकतो किंवा असे जर कोणी करीत असतील तर त्यांना रेंटने आपले छत देऊ शकतो. या काही प्राथमिक आयडिया आहेत. यापलिकडेही आपल्या कल्पनेनुसार वापर केला जाऊ शकतो.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement