SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या घडामोडी

 

विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद?
मुंबई : महाराष्ट्रात आज सायंकाळपासून (०९ एप्रिल) वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. त्यात काय सुरु नि काय बंद असेल ते जाणून घेऊ या..

Advertisement

विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद?
– आरटीपीसीआर ऐवजी रॅपिड अँटिजेन टेस्टला परवानगी
– आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहू शकतात.
– वृत्तपत्रांमध्ये मासिके, नियतकालिके, जर्नल्सचा आवश्यक सेवेत समावेश केला आहे.
– सुपरमार्केट, डी-मार्ट, बिग बजार, रिलायन्स बंद राहतील.
– एपीएमसी मार्केट विकेंड सुरु राहील.
– बांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकाने बंद.
– गॅरेज सुरु राहतील. प्रशासनानं तिथे कोरोना नियमांचं पालन केलं जाते का ते पाहावे. ऑटो पार्ट पुरवणारी दुकानं बंद राहतील.
– केंद्र सरकारच्या सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा पुरवठादार म्हणून समजले जाणार नाहीत. मात्र, ज्या सेवा अत्यावश्यक सेवेत गणल्या जातात त्यांना यातून सूट असेल.
– नागरिक होम डिलिव्हरी पद्धतीनं दारूखरेदी करु शकतात. मात्र, निश्चित वेळेतचं दुकानांकडून सेवा दिली जाईल. दारुची दुकानं खुली नसतील.
– रस्त्याशेजारील ढाबे सुरु असतील. मात्र, तिथेदेखील टेक अवे होम आणि होम डिलीव्हरी पर्याय उपलब्ध असेल.
– इलेक्ट्रिक उपकरणाची दुकानं बंद असतील.
– सेतू कार्यालय, नागरीक सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु असतील.
– रेस्टॉरंट आणि बार नियमांसह सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत फक्त पार्सल सुविधेसह सुरु असतील.

आयपीएलला दिमाखात सुरुवात
चेन्नई – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात शुक्रवारी (ता. ९ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या सीझनला सुरुवात झाली. गेल्यावर्षी आयपीएलचा किताब जिंकणारा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याच्यात चेन्नईमध्ये पहिला सामना झाला. पुढील दीड महिना ही स्पर्धा चालणार असल्याने क्रिकेट रसिकांसाठी मोठी मेजवानी असणार आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला होता.

Advertisement

दहावी-बारावीचा निर्णय पाच दिवसांत – गायकवाड
मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे या काळात परीक्षांचे आयोजन करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक स्तरातून उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली. आगामी ५ दिवसांत दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्या म्हणाल्या.

अर्णव गोस्वामी यांना दिलासा
मुंबई – अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना दिलासा मिळाला. अलिबाग सत्र न्यायालयात त्यांना उपस्थित राहण्यापासून वगळण्यात आले आहे. अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीश सारडा यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनीही अलिबाग न्यायालयात उपस्थित राहण्यापासून वगळण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे केली होती.

Advertisement

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची शक्यता
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचा पर्याय सरकारकडे आहे. मात्र, याबाबत विरोधी पक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे.
मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. अशातच आता रेल्वेदेखील बंद होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

राजधानी दिल्लीतील शाळा बंद
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी दिल्लीतही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथील राज्य सरकारने खबरदारी म्हणून सर्व शाळा (शासकीय, खासगी) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.

Advertisement

कोरोना लसीची निर्यात थांबवा – राहुल गांधी
नवी दिल्ली – देशवासीयांचा जीव धोक्‍यात घालून अन्य देशांना कोरोना लस निर्यात करणे योग्य आहे का, असा प्रश्‍न कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. कोरोना काळात देशभरात लसीचा तुटवडा निर्माण होणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. असे असताना या गंभीर काळात लसीकरणाच्या नावाने उत्सव कसले साजरे करता, असा सवालही त्यांनी मोदींना विचारला आहे.

सर्वांना लस उपलब्ध करून देणे सोपे काम नाही – अदर पूनावाला
नवी दिल्ली – सध्या भारतात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. आता सर्वांसाठी लस उपलब्ध करून देणे, वाटते तेवढे सोपे काम नाही, असे अदर पूनावाला यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. आपल्याकडचे लसीचे उत्पादन आणि त्याची उपलब्धता लक्षात घेणे आवश्‍यक आहे. सगळ्यांना लस उपलब्ध करून दिली, तर ज्यांना लसीची सगळ्यात जास्त गरज आहे, त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सगळ्यांना लस उपलब्ध करून देणे सोपे नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

Advertisement

नेत्यांना घरी कोरोना लस कशी दिली..?
मुंबई – राष्ट्रपती, पंतप्रधानही रुग्णालयात जाऊन कोरोना लस घेतात, तर महाराष्ट्रात काही राजकीय नेत्यांना त्यांच्या घरी कोरोना लस कशी दिली जाते?, राज्यातले नेते काही वेगळे आहेत का? असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या घरी कोरोनाची लस देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या नावाचा उल्लेख न करता, उच्च न्यायालयाने सरकारचे कान टोचले. तसेच यापुढे असे घडल्यास कारवाई करण्याचा इशारा उच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे.

नगरमध्ये २०२२ कोरोना बाधितांची भर
नगर- जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत 2022 ने भर पडली. शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र लॉकडाऊनच्या तिसर्‍या दिवसानंतरही कोरोना बाधितांचा आकडा वाढताच आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे. असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

 

Advertisement