SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या गैरहजेरीत तुमचा फोन वापरणाऱ्याचा क्षणात लागणार शोध; या ॲप द्वारे होणार अशक्यही शक्य!

मोबाईल ही काळाची गरज आणि माणसासाठी व्यसन झाले आहे. मोबाईल ही प्रत्येकाची पर्सनल गोष्ट असते हे तरी मान्य करावे लागेल. मात्र, अनेकांना दुसऱ्यांचे फोन बघण्याची किंवा त्यांचे चॅट्स वाचण्याची वाईट सवय असते.

अनेकदा आपण त्या लोकांना आपल्या फोन पासून दूर ठेवू शकत नाही किंवा आपल्या फोन मधला डेटा दुसर कोणी पाहू नये यासाठी कोणतीही उपाययोजना करणे आपल्या हाताबाहेर असते. आपल्या फोनला विशिष्ट पॅटर्नचेचे लॉक लावून आपण आपला डेटा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो.

Advertisement

मात्र, काही वाईट प्रवृत्ती विविध पॅटर्न ट्राय करून आपला फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना चांगलाच धडा आता मिळणार आहे. कारण, आता बाजारामध्ये असे एक ॲप उपलब्ध आहे. जेणेकरून, आपल्या अनुपस्थितीमध्ये आपल्या फोनला कोणी हात लावला आणि कसे अनलॉक करण्याचा प्रयत्न केला, याची माहिती या ॲपद्वारे आपल्याला मिळणार आहे.

Who Touched My Phone असे या ॲप असे नाव आहे. MidNightDev ने हे ॲप बनवले आहे. गुगल प्ले स्टोअर वर हे ॲप उपलब्ध असून त्याला 4.5 ची रेटिंग देखील आहे.

Advertisement

यामध्ये काही फीचर्स फ्री मध्ये उपलब्ध असून काही फीचर्स प्रीमियम मध्ये असल्याने आपल्याला त्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. हे ॲप फोन मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर याला हवा तो एक्सेस द्यावा लागतो.

तुमच्या अनुपस्थितीमध्ये कोणी फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करत असेल तर, त्या व्यक्तीचा त्वरित फोटो कॅप्चर करून हे ॲप तुम्हाला त्या व्यक्ती बद्दल माहिती देऊ शकते.

Advertisement

त्या व्यक्तीने किती वेळा आणि कोणता फोनचा पॅटर्न हाताळून पाहिला, कोणते ॲप उघडले, आणि किती वेळ फोन हाताळून पाहिला, हे देखील या ॲपमधून तुम्हाला कळू शकेल.

Advertisement