सध्या जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लोक त्रासले आहेत. 1 वर्षापेक्षा जास्त काळानंतरही लॉकडाऊनसारखी परिस्थिती पुन्हा पुन्हा वाट्याला येत आहे. आपणहून आपली स्वतःची काळजी न घेण्याने, मास्कचा वापर न केल्याने हा प्रादुर्भाव जास्त झाला आहे. आत त्याचा सामना करत असताना आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
‘ती’ बातमी HIV संदर्भातली…
▪️ ह्यूमन इम्युनोडेफिशिएंसी व्हायरस (HIV) अर्थातच एड्स या रोगावर लसीचा शोध गेल्या 30 वर्षांपासून चालला आहे. पण आता ही लस लवकरच मिळण्याची चिन्हे दिसत आहे.
▪️ कोरोनाचा हाहाकार जगभरात माजला असताना यात दक्षिण आफ्रिकेत ‘इबोला’ची दहशत अजूनही आहे. अशात एचआयव्हीच्या लसीबाबत आलेल्या या बातमीनं आरोग्य क्षेत्रासह एड्सग्रस्तांसाठी एक नवा आशेचा किरण आहे.
तसं पाहता..
▪️ जगात 2019 मध्ये तब्बल 38 मिलियन लोकांना एचआयव्ही एड्सची लागण झाल्याचं समोर आलं होतं. फेब्रुवारी महिन्यात एचआयव्हीवरील लसीच्या शोधाबाबत घोषणा केली होती.
▪️ तर फेब्रुवारी महिन्यात नॉन प्रोफिट ड्रग डेव्हलपर IAVI आणि स्क्रिप्स रिसर्च इंस्टिट्यूटने या लसीच्या बाबत घोषणाही केली होती. या लसीमुळे इम्यून सेल्स उत्पादन वाढू शकेल, असा निष्कर्ष रिसर्चमधून समोर आला आहे. ज्यामुळं अँटीबॉडी निर्मितीसाठी अधिक उपयोग होणार आहे.
लस – पहिल्या टप्प्यात
HIV च्या लसीबाबत घोषणा झाली असली, तरी या लसीला अजून काही महत्वाचे टप्पे पार करावे लागणार आहेत. सध्या या लसीची पहिली ट्रायल पूर्ण झाली आहे. रिसर्चकर्त्यांनी सांगितलं की, ‘ हा पहिला टप्पा आहे. या लसीमुळं एड्स मुक्त विश्व होण्याकडे पहिलं पाऊल टाकलं असल्याचं’, बोललं जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs