SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे’साठी गडकरींनी मिशी पणाला लावली होती..

मुंबई – सध्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पाहिलाय.. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी हे राज्यात मंत्री असताना हा रस्ता बनवला गेलाय. कमी खर्चात दर्जेदार काम करून घेण्यात गडकरी हे माहीर आहेत. मात्र, हा एक्सप्रेस बनविण्यासाठी त्यांनी चक्क आपली मिशी पणाला लावली होती. काय होता हा किस्सा.. कशामुळे गडकरी यांच्यावर ही वेळ आली होती, हे आज आपण जाणून घेऊ या..

नितीन गडकरी यांच्याच कार्यकाळात, म्हणजेच राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता असताना, मुंबई-पुणे हा प्रसिद्ध एक्सप्रेस वे बनवण्यात आला. त्यासाठी त्यांनी चक्क प्रसिद्ध उद्योजक धीरूभाई अंबानी यांच्यासोबत पंगा घेतला.

Advertisement

मुंबई-पुणे एक्प्रेस वेच्या कामाची निविदा काढण्यात आली. त्यात धीरूभाई यांनी सर्वात कमी ३६०० कोटींचे टेंडर भरले होतं; पण नितीन गडकरींना त्यापेक्षाही कमी खर्चात हा रस्ता करायचा होता. शिवाय राज्य सरकारच्या तिजोरीतही खडखडाट होता. हा रस्ता दोन हजार कोटी रुपये खर्चात होईल, असा विश्वास गडकरी यांना होता; पण सर्वात कमी रकमेचे टेंडरच ३६०० कोटींचं होतं.

मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांनी सर्वात कमी रकमेचे टेंडर असणाऱ्या अंबानी यांना हे काम द्यावं, असं सुचवलं. मात्र, गडकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना सांगितले, की दोन हजार कोटीच्या कामाला ३६०० कोटी, म्हणजे खूप जास्त होतात. त्यामुळे हे टेंडर रिजेक्ट करावे.

Advertisement

धीरूभाईंचा त्यावेळी मोठा दबदबा होता. गडकरी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि मुंडेंना समजावलं. ‘मी स्वस्तात रस्त्याचे काम करण्यासाठी मार्ग काढतो’ अशी ग्वाही दिली. सरकारकडे एवढे पैसे नव्हते. त्यामुळे हे पैसे कुठून आणणार, असा प्रश्न जोशी यांनी केला. यावर गडकरी म्हणाले, की माझ्यावर विश्वास ठेवा, मी करतो सोय! अखेर मुख्यमंत्री जोशी यांनी ते टेंडर नाकारलं.

धीरूभाई यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्यासोबत खूप चांगले संबंध होते, तरीही टेंडर नाकारल्याने धीरूभाई नाराज झाले. त्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली. त्यामुळे महाजन यांनी नितीन गडकरी यांनाच धीरूभाई यांची समजूत काढण्यासाठी पाठवलं. एके दिवशी नितीन गडकरी धीरूभाई यांना भेटायला गेले. त्यांच्यासोबत जेवण केलं. जेवता जेवता धीरूभाई यांनी हा रोड कसा बनवणार, असा सवाल गडकरी यांना केला.

Advertisement

बोलता बोलता धीरूभाई यांनी हा रस्ता कमी खर्चात बनवूनच दाखव, असे चॅलेंज केलं. गडकरी यांना त्यांचे शब्द लागले. ते म्हणाले, की ‘धीरुभाई हा रोड जर मी कमी खर्चात बनवला नाही, तर मी माझ्या मिशा कापून टाकेल.’ मिटिंग संपली; पण गडकरी समजवायला गेले नि चॅलेंज देऊन आले.

नितीन गडकरी यांनी त्यावेळी राज्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली. पैशांचा प्रश्न होताच. त्यावर गडकरी यांनी अनेक कंपन्यांना पैशांसाठी प्रस्ताव पाठवले. त्यातुन रस्त्यासाठी पैसे मिळाले. अखेर रस्त्याचे काम सुरु झाले आणि विशेष म्हणजे हे काम दोन हजार कोटींपेक्षा कमी खर्चात झाले. गडकरी यांनी करून दाखवल..

Advertisement

मै हार गया..

धीरूभाई यांनी एके दिवशी रोड झाल्याचं हेलिकॉप्टरमधून बघितलं. त्यांनी लगेच गडकरींना भेटायला बोलावलं. भेटल्यावर धीरुभाई म्हणाले, ‘नितीन मै हार गया, तुम जीत गये’. तू करून दाखवलंस आणि रोड झाला. तुझ्यासारखे ४-५ लोक देशात असतील, तर देशाचं नशीबच बदलेल.’

Advertisement

‘भारताचे रोडमॅन’

सरकारचे पैसे वाचवण्यासाठी धीरूभाई यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीसोबत फक्त नितीन गडकरीच पंगा घेऊ शकतात. नितीन गडकरी यांच्या कामाचा झपाटाच इतका मोठा आहे, की आता त्यांना ‘भारताचे रोडमॅन’ म्हणूनच ओळखलं जाते. त्यांच्या कार्यकाळात देशात रेकॉर्ड ब्रेक रस्त्यांची कामे होत आहेत.

Advertisement

देशभरात गडकरी हे खूप वेगाने चांगल्या रस्त्यांचं जाळंच विनत आहेत. मागील आर्थिक वर्षात देशात २६.११ किलोमीटरच्या गतीने जवळपास ७५७३ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यात आला.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement