SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जन्म झाल्यानंतर पहिले प्रमाणपत्र कोणाच्याही आयुष्यात येत असेल ते म्हणजे जन्म प्रमाणपत्र होय! आयुष्यात पुढे या प्रमाणपत्राचा भरपूर उपयोग होतो. ज्या व्यक्तीच्या नावे प्रमाणपत्र असते ती व्यक्ती हयात आहे की नाही, इथपासून ते तिच्या पासपोर्ट, शिक्षण, आणि इतर सर्व संविधानिक क्रियांमध्ये जन्म प्रमाणपत्र हे अत्यंत उपयुक्त प्रमाणपत्र मानले गेले आहे.

आपले जन्म प्रमाणपत्र कुठल्या स्थानी मिळते? आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अगदी सहज सोपे वाटू शकते. आपण ज्या ठिकाणी जन्म घेतला त्या ठिकाणी आपले जन्म प्रमाणपत्र आपल्याला मिळते. म्हणजे ते शहर आपले जन्मस्थान म्हणून त्यावर प्रमाणपत्रावर नोंद होत असते. मात्र, काही आपत्कालीन घटनांमध्ये जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी भरपूर गोंधळ उडू शकतो.

Advertisement

आज आपण अशाच एका आपत्कालीन घटनेविषयी जाणून घेणार आहोत, ज्या मध्ये जन्म प्रमाणपत्र कुठे मिळणार? याचे उत्तर अतिशय उपयुक्त आहे. जन्म घेणे किंवा मृत्यू होणे ही गोष्ट कोणाच्याही हातात नाही. त्याची वेळ किंवा काळ ठरलेला नसतो. विज्ञान कितीही पुढे गेले तरी देखील या दोन गोष्टींवर मानवाचे नियंत्रण नाही.

जर एखाद्या स्त्रीला प्रसववेदना फ्लाइट टेक ऑफ केल्यानंतर म्हणजेच विमानात बसल्यानंतर विमान उडल्यानंतर सुरू झाल्या तर, अनेकदा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मिळेल त्या ठिकाणी विमानाचे लँडिंग करावे लागते.

Advertisement

विमानात असलेला मेडिकल स्टाफ त्या स्त्रीची आणि बाळाची आरोग्य तपासणी करून ते दोघेही व्यवस्थित असतील तर विमान ज्या ठिकाणी जाणार आहे, तिथेच लॅंड होते आणि उडत्या विमानातच अशा स्त्रीची प्रसूती करवून घेतो.

मात्र, अशा वेळी या मुलाचा किंवा त्या नवजात शिशूचा जन्म नेमका कोठे झाला? ते स्थान कोणते? याविषयी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचे जन्म प्रमाणपत्र कुठे बनवायचे? हादेखील मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि यात अडचणी देखील येऊ शकतात.

Advertisement

अशा उडत्या विमानात जर एखाद्या स्त्रीची प्रसूती झाली तर ते विमान जिथे लँड होईल ते शहर त्याचे जन्मस्थान म्हणून नोंदवण्यात येते हा नियम आहे. समजा, मुंबईवरून एखादे विमान उडाले आणि त्या जयपूरला लँड होणार असेल तर जयपूर हे त्या मुलाचे जन्मस्थान म्हणून जन्म प्रमाणपत्रात त्याची नोंद होते. त्याचबरोबर विमान कंपनीशी निगडित जे प्रशासन असेल त्याच्याकडून जन्म प्रमाणपत्र मिळवण्याच्या संपूर्ण प्रक्रिया सुरू होतात. कारण, प्रवास करणारी व्यक्ती ही त्या शहरात नवीन असू शकते. तिला त्या बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यास, त्या विमान प्रशासनाने त्या बालकाचे जन्म प्रमाणपत्र मिळवून देणे बंधनकारक असते..

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन 🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement