मुंबई – भूत म्हटलं कोणाच्याही अंगाच्या थरकाप उडतो. त्यामुळेच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना हा विषय नेहमीच भावला आहे. हिंदीत या विषयावर अनेक चित्रपट व मालिका निघाल्या असल्या, तरी मराठीत या विषयाकडे सहसा कोणी जात नव्हते. मात्र, झी-मराठीवर ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका आली नि तिने रसिकांच्या अंगाचा थरकाप उडविला.
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या दोन्ही पर्वाला रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. रसिकांची वाढती पसंती पाहून झी-मराठी वाहिनेने या मालिकेचा तिसरा भाग आता रसिकांसमोर आणला आहे. ‘रात्रीस खेळ चाले-३’ सुरु झाल्यापासून तिलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. मालिकेच्या प्रत्येक भागात नवनवे ट्विस्ट समोर येत असल्याने रसिकांना खिळवून ठेवण्यात तिसरे पर्वही यशस्वी झाले आहे.
View this post on Instagram
Advertisement
सध्या रसिकांना अण्णा नाईक आणि शेवंता यांना पाहण्याची उत्सुकता लागली आहे. सुरुवातीच्या दोन्ही भागांत मालिकेतील सर्वच कलाकारांनी जीव ओतून काम केले होते. त्यामुळे हे कलाकार रसिकांच्या गळ्यातील ताईत झाले. मात्र, या सगळ्यांत अधिक प्रसिद्धी मिळाली, ती अण्णा नाईक आणि शेवंता या जोडीला.. रसिक आजही त्यांना विसरलेले नाहीत. माधव अभ्यंकर यांनी साकारलेल्या अण्णा नाईक या खलनायकाने तर अनेकांना धडकी भरवली.
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
अपूर्वा नेमळेकर हिने शेवंताची भूमिका अगदी समरसून केली. त्यामुळे तिलाही रसिकांची तुफान पसंती मिळाली. आता मालिकेच्या तिसऱ्या भागात ही जोडी कधी भेटीला येतेय, याची रसिकांना उत्सुकता लागली आहे. ही बाब हेरून निर्मात्यांनी मालिकेचे हटके प्रमोशन करीत रसिकांची उत्सुकता अधिक ताणवली आहे. ‘रात्रीस खेळ चाले-३’ मालिकेच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे लढवले जात आहेत.
View this post on Instagram
Advertisement
शहरात मोक्याच्या जागी होर्डिंग लावले आहेत. पण त्यावर दिवसा काहीच दिसत नाही. ‘जशी काही भुते रात्री दिसतात, तसेच या होर्डिंगवर अण्णा नाईक रात्रीच प्रकट होतात..’ असे म्हणत प्रमोशनचा अनोखा फंडा समोर आणला आहे.
मालिकेच्या दोन्ही पर्वाचे दिग्दर्शन राजू सावंत व लेखन प्रल्हाद कुरतडकर आणि राजेंद्र घाग यांनी केले होते. आता तिसऱ्या पर्वासाठीही दिग्दर्शक, लेखक यांच्यासह कलाकारांची तीच टीम कायम ठेवली आहे. मात्र अभिनेत्री ऋतुजा धर्माधीकारीने साकारलेली सुसल्याची भूमिका या पर्वात अभिनेत्री पौर्णिमा डे साकारत आहे.