SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोदी सरकारकडून लसीकरण झालेल्या लोकांसाठी अनोखी स्पर्धा; विजेत्यांना मिळणार दरमहा 5 हजार!

देशात कोरोनाची प्रकरणे पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहेत. लसीकरणाला सुरुवात झालेली असली तरी, अनेक लोकांच्या मनात लसीकरणाविषयी भीती आहे. त्यामुळे स्वतःहून लोक पुढे येऊन कोरोना लस घेत नाहीत.

लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्थानिक पातळीवर लसीकरणाच्या बदल्यात लोकांना काही न काही दिले जात आहे. मोदी सरकारने आता लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे.

Advertisement

लस घेणाऱ्यांसाठी एक स्पर्धा मोदी सरकारने आयोजित केली आहे. यातून 10 निवडक लोकांना दरमहा 5 हजार रुपये मिळणार आहेत.

मात्र, यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या mygov.in या वेबसाईटवर जाऊन स्पर्धेविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये असा प्रत्येक जण सहभाग घेऊ शकतो, ज्या व्यक्तीने कोरोना लसीकरण करून घेतले आहे.

Advertisement

तुमच्या कुटुंबातील किंवा अगदी तुम्ही देखील कोरोना लस घेतली असेल तर तुम्हाला फक्त एकच काम करायचे आहे. कोरोना लस घेताना फोटो काढायचा आणि लसीकरणाचे महत्त्व सांगणारी एक छानशी टॅगलाईन त्या फोटोला देऊन दिलेल्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं.

लॉग इन आयडी, ओटीपी मार्फत तुमच्या सोशल मीडिया अकाउंट मार्फतही लॉग इन करण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे. आवश्यक ती माहिती भरून तुमची एंट्री पाठवायची आणि तुमचा फोटो आणि टॅगलाईन यासोबतच जोडायचे.

Advertisement

या टॅगलाईनमध्ये इतरांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याची ताकद असायला हवी. यातून 10 विजेत्यांची निवड केली जाणार आहे. त्यांना दर महिन्याला 5 हजार रुपये दिले जातील. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंतची मुदत असल्याची माहिती मिळत आहे.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement