मोबाईल क्षेत्रात अग्रेसर नोकिया कंपनी आज (8 एप्रिल) लॉंचिंग इव्हेंटमध्ये X सिरीज, G सिरीजमधील स्मार्टफोन लॉंच करणार आहे.
नोकिया जी 10 (Nokia G10), नोकिया जी 20 (Nokia G20), नोकिया एक्स 10 (Nokia X10) आणि नोकिया एक्स 20 (Nokia X20) या स्मार्टफोन्सबाबतची खूप माहिती काही दिवसांआधीच लीक झाली होती.
आजच्या इव्हेंटमध्ये कंपनी हे स्मार्टफोन लाँच करु शकते. (Nokia launching new smartphones today, Nokia G10, G20 and Nokia X10, X20)
नोकियाचे एक्स सिरीज स्मार्टफोन हे बजेट 5 जी फोन असतील. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 SoC सह 5000mAh बॅटरी असेल. तर G10 आणि G20 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल.
हे फोन 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:30 वाजता लाँच केले जातील. परंतु आतापर्यंत फोनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. नोकिया जी सिरीजची प्रारंभिक किंमत 11,999 रुपये असू शकते आणि हा हँडसेट ब्लू आणि पर्पल रंगात येईल.
फीचर्स-
नोकिया जी 10 मध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलियो पी 22 SoC प्रोसेसर तर नोकिया जी 20 मध्ये मीडियाटेक हेलियो जी 35 एसओसी प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हे फोन 3 जीबी आणि 4 जीबी रॅम अशा दोन व्हेरिएंटसह सादर केले जाणार आहे.. या फोनच्या स्टोरेजमध्ये 32 जीबी आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात येऊ शकतो.
कॅमेऱ्याबद्दल- या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल जो 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर कॅमेरा, 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसोबत येईल. सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल, या फोनची बॅटरी 5000 एमएएच क्षमतेची असेल, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करेल.
Nokia X10 5G, X20 5G फोनची किंमत आणि स्पेक्स
नोकिया X10 5G ची किमत जवळजवळ 25,000 रुपये असू शकते. ज्यामध्ये आपल्याला 6 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. त्याचबरोबर नोकिया X20 5G ची किंमत सुमारे 30,000 रुपये असू शकते. या किंमतीत आपल्याला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल.
कॅमेर्याबद्दल – बोलायचे झाल्यास, यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल जो 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरासोबत येईल. या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, हा फोन 4500mAh बॅटरीसह येईल जो 10W चार्जिंगला सपोर्ट करू शकेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 इतर महत्वाच्या बातम्या :
1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/tcKlbw9