राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, राज्यात रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय 30 एप्रिलपर्यंत आठवड्यातून 2 दिवस (शनिवार व रविवार) लॉकडाऊन असणार आहे.
दिवसा अनेक कडक निर्बंध जारी करत त्याबाबत नियमावलीही जारी केली आहे. तरी देखील राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे.
गेल्या 24 तासांत समोर आलेली कोरोनाबाधितांची आकडेवारी
▪️ अहमदनगर : गेल्या 24 तासात 1652 कोरोना रुग्णांची भर; कर्जत, राहाता, नगर तालुक्यात उद्रेक कायम, काही तालुक्यांनी गाठली शंभरी
▪️ नाशिक : जिल्ह्यात 4122 नव्या रुग्णांची वाढ, 24 जणांचा मृत्यू
▪️ मुंबई : 10,428 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, 23 जणांचा मृत्यू
▪️ चंद्रपूर : 637 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, 5 जणांचा मृत्यू
▪️ अमरावती : जिल्ह्यात काल दिवसभरात 4 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू, 344 कोरोनाबाधितांची वाढ
▪️ यवतमाळ : 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, 350 नव्या कोरोनाबाधितांची वाढ
▪️ निफाड : तालुक्यात 229 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले, आतापर्यंत एकूण 214 रुग्णांचा मृत्यू
▪️ भंडारा : कोरोनाचे 1177 रूग्ण वाढले, 9 जणांचा मृत्यू
▪️ येवला : काल 43 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, असून आतापर्यंत 82 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
▪️ अकोला : कोरोनाचे 263 रुग्ण वाढले, 8 रुग्णांचा मृत्यू
▪️ जालना : 614 कोरोनाबाधितांची नोंद, 6 जणांचा मृत्यू
▪️ नांदेड : 26 रुग्णांचा मृत्यू, 1255 नवे रुग्ण
▪️लातूर : काल उच्चांकी 969 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2 जणांचा मृत्यू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 इतर महत्वाच्या बातम्या :
1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/tcKlbw9