नवी दिल्ली – सोने खरेदीचा विचार असेल, तर वेळ घालू नका. कारण, जागतिक बाजारात आज (ता. ८ एप्रिल) सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. एमसीएक्सवरील जून वायदा 0.14 टक्क्यांनी घसरून ४५ हजार ३५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला होता. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रति किलो ६५ हजार ७० रुपयांवर आला आहे. सोने विक्रमी पातळीपेक्षा ११ हजार रुपयांवर कमी व्यापार करीत आहे.
ऑगस्टमध्ये भारतात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५६ हजार २०० रुपयांवर गेले होते. ऑगस्टपासून सोन्याच्या किंमतीत सुमारे ११ हजार रुपयांची घसरण झाली आहे. वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत सोने प्रत्येकी 10 ग्रॅममागे ५ हजारांनी स्वस्त झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची घसरण सुरू असल्याचे दिसते. अमेरिकेतील सोन्याचा भाव प्रति औंस ४.०४ डॉलरने घसरून १,७२४.९५ डॉलरवर आला आहे. त्याचबरोबर चांदी ०.०९ डॉलर खाली घसरून २४.८९ डॉलरवर आले आहे.
दिल्लीत आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८ हजार ४६० रुपये आहे. चेन्नईत ४६ हजार ६८० रुपये, मुंबईत ४४ हजार ९२० रुपये, तर कोलकातामध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७ हजार ४८० रुपये होता.
किमती पुन्हा वाढण्याची शक्यता
गुंतवणुकीसाठी सोने नेहमीच चांगला पर्याय ठरला आहे. येत्या काही काळात सोन्याच्या किमती पुन्हा गुंतवणूकदारांना चांगले उत्पन्न देऊ शकतात, असे सांगितले जाते. ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या संशोधन अहवालानुसार, सध्या सोनं चांगली कामगिरी करत आहे.
गेल्या वर्षीही सोन्याच्या किमतीचा विक्रम झाला होता. परंतु या क्षणी तरी ऑगस्टपासूनच्या विक्रमी उच्चांकावरुन सोने सुमारे 11 हजार रुपयांनी स्वस्त झाल आहे. अशा वेळी सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.
या वर्षाखेरीस 2021च्या शेवटी सोन्यात पुन्हा वाढ दिसून येईल. दीर्घ कालावधीत सोने नेहमीच चांगले उत्पन्न देते. ५ मार्च रोजी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४३ हजार ८८७ रुपये होते. त्यानंतर सोने सुमारे ९५० रुपयांनी महागले. तज्ज्ञांच्या मते लग्नाचा हंगाम जवळ येईल, तसे सोन्याची मागणी वाढू लागेल. काही महिन्यांनंतर सोन्यात अधिक तेजी येऊ शकते. वर्षाअखेरीस सोने ४८ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.