SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एटीएममधून फाटक्या नोटा आल्या, मग काळजी कसली? फक्त ‘एवढे’ करा

एटीएममधून पैसे काढायला गेल्यावर अनेकदा फाटक्या नोटा हाती येतात. आता या पैशांचे करायचे काय, असा प्रश्न पडतो. मग आपणही कोणीतरी बकरा शोधतो आणि त्याच्या माथी या नोटा मारायचा प्रयत्न करतो. कधी त्यात यश येते, तर कधी दुकानदार हुशार निघतो.. तुम्ही दिलेली नोट तो मागून-पुढून न्याहाळून पाहतो.

आपला प्रयत्न फसतो. फाटकी नोट पुन्हा बदलून द्यावी लागते.. मग बऱ्याचदा या फाटक्या नोटांचा खिशातच चोळामोळा होतो नि त्यांचे आयुष्य संपते. मात्र, त्याचा भुर्दंड नाहक सहन करावा लागतो..

Advertisement

पण, आता काळजी नसावी. कारण एटीएममधून जरी आता फाटक्या नोटा आल्या तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण या नोटा बदलून देण्याची जबाबदारी संबंधीत बँकांवर आहे. त्या तुम्हाला नकार देऊ शकत नाही. हा.. त्याची प्रोसेस थोडी किचकट आहे एवढेच.. तर आज जाणून घेऊ या की फाटक्या नोटा कशा बदलून घ्यायच्या ते..

रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमानुसार, एटीएममधून जर फाटकी नोट आली, तर बँकेत जाऊन ती आपणास बदलता येते. कोणतीही सरकारी वा खासगी बँक या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाहीत..

Advertisement

जर समजा एखाद्या बँकेने या नोटा बदलून देण्यास नकार दिलाच, तर पोलीस ठाण्याचे दार उघडे आहेच की.. आपण पोलिसांत तक्रार केली तर संबंधीत बँकेला १० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

कशा बदलून घेणार फाटक्या नोटा..?

Advertisement

आपण ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले असतील, त्या बँकेत जाऊन पहिल्यांदा कळवावे लागेल. पैसे काढल्याची तारीख, वार, वेळ आणि ठिकाण विसरू नका. एटीएममधून आलेली स्लिपही सोबत जपून ठेवा. कारण अर्ज करताना या सगळ्या बाबी लागणार आहेत.

बँकेच्या अर्जाला या बाबी जोडून द्यायच्या. समजा, एटीएममधून स्लिप मिळालीच नसेल, तरी काळजी नको. तुमच्या मोबाईलवर मेसेज आला असेलच की.. बँकेला त्याची माहिती द्यायची. असे सगळे दिल्यावर बँक तुम्हाला लगेच तुमची फाटकी नोट बदलून देईल आणि काही वेळातच तुमच्या हाती कोरी करकरीत नोट पडेल.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement