SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ बुधवार, 7 एप्रिल 2021

मेष :- घरगुती कामासाठी छोटे प्रवास करावे लागतील हाती घेतलेले काम जिद्दीने पूर्ण कराल. आपले मानसिक स्वास्थसुधारेल. अधिकारावर असणाऱ्या स्त्री व्यक्तीकडून आपले लांबलेले काम होईल.

Advertisement

वृषभ :- गुंतवणूकीस अनुकूल दिवस आहे. अपेक्षित पत्रे येतील. कामासाठी परप्रांतीशी केलेली बोलणी यशस्वी होतील. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल.

मिथुन :- आपल्या हातून चांगले सामाजिक कार्य घडल्याने प्रतिष्ठा मिळेल. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपल्याला मताचा समाजात आदर होईल.

Advertisement

कर्क :- आध्यात्मिक लिखाणास आजचा दिवस अनुकूल आहे. प्रवास योगातून व्यवसायासंबंधी भाग्यकारक घटना घडेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल.

सिंह :- स्वतचे म्हणणे दुसर्यांवर लादू नका. आपण आज केलेल्या प्रवासामुळे इच्छापुर्ती घडेल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळेल.

Advertisement

कन्या :- आपल्या व्यक्तिमत्वाचा समाजात प्रभाव पडेल. व्यवसायात भाग्यवृद्धी घडेल. कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वतःचे काम स्वतःच करावे.

तूळ :- मौल्यवान वस्तूखरेदीस अनुकूल दिवस आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या मागण्या मान्य करतील. आपल्या जोडीदारावर आपल्या मतांचा पगडा राहील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल.

Advertisement

वृश्चिक :- मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. आपले अंदाज चुकतील. सामाजिक पत उंचावेल. वैराण वाळवंटाची वाट संपत आल्याची चिन्हे दिसून येतील. गुप्तवार्ता कानी येतील.

धनू :- भागिदारी व्यवसायात भागिदारामुळे कार्यक्षेत्रात वाढ होईल. समारंभात सहभागी व्हाल. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद घ्याल. गुंतवणूकीतून लाभ होतील.

Advertisement

मकर :- नोकरीत सुसंधी चालून येतील. महत्वाचे निर्णय घेऊ नका. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल.

कुंभ :- आपल्या हातून चांगले लिखाण होईल. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आज आपली निकड भागणार आहे.

Advertisement

मीन :- अपेक्षित गाठीभेटी फायद्याच्या ठरतील. दिवसाची सुरुवात अतिशय आनंदात होईल.थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement