SpreadIt News | Digital Newspaper

इंदोरीकरांचे व्हिडीओ प्रसारित करणारे यु-ट्यूब चॅनेल अडचणीत

0

नगर : बाळाच्या जन्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्याविरुद्ध संगमनेर न्यायालयात खटला दाखल झाला होता. मात्र, या प्रकरणात न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना दिलासा देताना त्यांच्याविरुद्धचा खटला रद्द केला होता. त्यावेळी यु-ट्यूब चॅनेलमुळे इंदोरीकर महाराज अडचणीत आले होते.

आता इंदोरीकर महाराज यांनीही त्याचा वचपा काढण्याचे ठरवले आहे. महाराजांनी आता यु-ट्यूब चॅनेलविरोधात मोर्चा वळविला आहे. कोणतीही परवानगी न घेता, महाराजांची कीर्तने प्रसारित करणाऱ्या यु ट्यूब चॅनेलविरुद्ध इंदोरीकर महाराजांनी तक्रार केली असून, स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे यांच्याकडून या यु टुयब चॅनेल्सला नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

Advertisement

एका वक्तव्यावरुन वादात अडकल्यानंतर निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी त्याचं सार खापर यु-ट्युब चॅनेल्सवर फोडले होते. याबाबत त्यांनी 16 जुलै २०२० रोजी पुणे येथील स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. त्यानुसार या यु-ट्यूब चॅनलविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

कोरोना विषाणू संसर्गामुळे इंदोरीकर महाराजांनी केलेल्या तक्रारीचा तपास संथगतीने सुरु होता. परंतु, फेब्रवारी-२०२१ पासून तपासाला गती आली. पोलिसांनी आतापर्यंत कीर्तनाच्या चार हजार व्हिडीओच्या यु-ट्युब लिंक डाऊनलोड केल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांकडून 25-30 मोठ्या यु-ट्युब चॅनेलला नोटीसा पाठवल्याची माहिती मिळाली.

Advertisement

तक्रारीत इंदोरीकर महाराज म्हणतात…

“माझं कोणतही अधिकृत संकेतस्थळ किंवा यु-ट्युब चॅनेल नाही. समाजप्रबोधनाच्या भावनेतून किर्तनामध्ये बोलतो. यु-टयुब चॅनेलवरुन माझ्या परवानगीशिवाय व्हिडीओ प्रसारित केले जात आहेत. तसेच, एका यु-टुयब चॅनेलच्या चालकांनी माझ्याबाबत अर्वाच्च भाषा वापरली. आर्थिक फायद्यासाठी माझे व्हिडीओ विनापरवागनी प्रसारित करणे, व्हिडीओत छेडछाड करुन आपली प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी संबंधीत चॅनेलवर कारवाई करावी.”

Advertisement

बीडमधील एका कीर्तन सोहळ्यात वादावर भाष्य करताना, इंदोरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनल्सवरच खापर फोडलं होतं. “यू-ट्यूबवाले, कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदोरीकर संपवायला निघालेत; पण मी बोलतो ते खरं आहे. मी कशात सापडत नसल्याने मला अडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता लय झालं.. फेटा ठेवून द्यायचा. आपली सहनशिलता संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचा.. आता शेती करायची. बस्स.. आता नको, मजा नाही राहिली.”

यू-ट्यूबवाल्यांनी इंदोरीकराच्या नावाने मोक्कार पैसा कमावला. मी एक रुपयाही घेतला नाही. यू-ट्यूबवाली मंडळी कोट्यधीश झाली, अशा शब्दांत इंदोरीकर महाराजांनी यु-ट्यूब चॅनेलबाबत नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांनी नोटिसा पाठवल्याने यु ट्यूब चॅनेलचे धाबे दणाणले आहे.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

 

Advertisement