आयपीएलच्या 14व्या सत्राला 9 एप्रिलला प्रारंभ होत आहे. यंदाच्या वर्षी पहिला सामना हा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात चेन्नईत होणार आहे. आतापर्यंतच्या झालेल्या 13 हंगामात अनेक विक्रम झाले आहेत. पण काही जबरदस्त विक्रम आहेत जे खास आहेत आणि ते मोडणे खूप अवघड आहे.
शॉन मार्श – ऑस्ट्रेलियाच्या या क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात करण्याआधी आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवली होती. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील तो एकमेव खेळाडू आहे ज्याने अशी कामगिरी केली. शॉन मार्शने 2008 च्या हंगामात 11 सामन्यात 616 धावा फटकावल्या होत्या.
युवराज सिंग – भारताचा हवेत चेंडू भिरकवणारा फलंदाज, सिक्सर किंग युवराज सिंगने 2009 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना 2 वेळा हॅटट्रिक घेऊन मैदान गाजवलं होतं. युवराजने पहिल्यांदा RCB आणि नंतर डेक्कन चाजर्स विरुद्ध हॅटट्रिक घेतली. या शिवाय त्याने 340 धावा देखील केल्या. एका हंगामात 2 हॅटट्रिक आणि 300हून अधिक रन्स करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
जॅक कॅलिस – दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जगातील सर्वोत्तम ऑल राउंडर असलेल्या जॅक कॅलिसने ने 2010 साली RCBकडून 16 सामन्यात 572 धावा केल्या होत्या. इतकंच नाही तर त्याने 13 विकेटही त्यावेळी घेतल्या होत्या. एका हंगामात 500हून अधिक धावा आणि 13 विकेट घेणारा तो एकमेव खेळाडू असून हा विक्रम सहजासहजी कोणाला मोडणे तसं अवघडच आहे.
एका ओव्हरमध्ये 37 रन्स – वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने 2011च्या हंगामात RCBकडून खेळत असताना कोची टस्कर्सविरुद्ध एका ओव्हरमध्ये 37 धावा केल्या. यात 4 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. या ओव्हरमध्ये एक वाइड बॉल टाकला गेला होता. हा विक्रम मोडणेही कठीण आहे.
ख्रिस गेल – आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकारांचा पाऊस पाडणारा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएलच्या हंगामात 2013 साली 59 षटकार मारले होते. तेव्हा गेलने 14 सामन्यात 733 धावा केल्या होत्या.
ख्रिस गेल, 175 धावा – एकेक कामगिरी करत वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 2013 साली पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध खेळताना 175 धावा केल्या होत्या. या तुफान वादळाने आपल्या खेळीत 17 षटकार आणि 13 चौकार फटकारले. एका डावातील हा सर्वोच्च स्कोअर आहे
विराट कोहली – आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. रनमशिन विराटने 2016 साली सर्वाधिक 973 धावा केल्या होत्या. यात 4 शतकांचा समावेश होता. विराट सोडून इतर कोणत्याही फलंदाजाला एका हंगामात 800 हून अधिक धावा काढता आल्या नाहीत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs
🎯 इतर महत्वाच्या बातम्या :
1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/wcSISd6