इंटरनेटवर, सोशल मीडियावर, किंवा अगदी गुगलवर देखील आपल्याला अनेकदा खोट्या बातम्या आणि अफवा पसरलेल्या दिसतात. याला आपण फेक न्युज असे म्हणतो. याच फेक न्यूज कशा ओळखायच्या आणि फॅक्ट चेक कसे करायचे? याविषयी गुगलने यूजर्ससाठी काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्सचा वापर करून तुम्ही फेक न्यूज पासून स्वतःचा बचाव करू शकता.
न्यूज कव्हरेज
न्यूज औटलेट्स ने न्यूज कशी कव्हर केली आहे हे तुम्हाला गुगलच्या एका फिचर द्वारे जाणून घेता येऊ शकते. न्यूज सेक्शन मध्ये news.google.com इथे तुम्ही हवी ती बातमी शोधून ऑप्शन उपलब्ध असल्यास फुल कवरेज वर क्लिक करून यासंबंधी माहिती मिळवू शकता.
ऑथेंटिक फोटो
फोटो ऑथेंटिक आहे की नाही यावरून देखील न्यूज ची सत्यता तुम्हाला कळू शकते. गुगल वरून इमेजेस मध्ये सर्च करून तुम्ही फोटो कुठला आहे तो खरा आहे की नाही? किंवा तो व्हाट्सअप वरून फॉरवर्ड केलेला तर नाहीये ना? याविषयी माहिती मिळवू शकता. फोटो वर राईट क्लिक करून देखील तुम्हाला याबाबतची माहिती मिळू शकते.
गुगल मॅप्स
बातमीची सत्यता पडताळण्यासाठी गुगल मॅप तुम्हाला मदत करु शकता. एखाद्या बातमीचा फोटो त्या ठिकाणचा आहे का नाही, हे तुम्ही अर्थ व्ह्यूव किंवा स्ट्रीट व्ह्यूव गुगल मॅप वर सर्च करून बघू शकता.
फॅक्ट चेकर्स
फॅक्ट चेक एक्सप्लोरर मध्ये तुम्ही एखादा विषय निवडून तो शोधण्याचा प्रयत्न करू शकता. जगभरातून 1 लाखाहून अधिक वेळा फॅक्ट चेक केलेले विषय तिथे तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 इतर महत्वाच्या बातम्या :
1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/wcSISd6