SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

क्रिकेटजगत ढवळून काढणारे आयपीएलमधील सहा मोठे वाद

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग.. जगातील क्रमांक एकची लीग क्रिकेट स्पर्धा.. क्रिकेट आणि बॉलीवूडमधील सिलेब्रेटींचा डोळे दिपवणारा एक सोहळा.. येत्या ९ एप्रिलपासून कोट्यवधी भारतीयांचा हा आवडता सोहळा सुरु होत असून, सगळ्यांनाच त्याची उत्सुकता लागली आहे. मात्र, कोणतीही स्पर्धा म्हटली, की वाद तर होणारच.. मग त्यापासून आयपीएल तरी कशी वाचणार? अगदी पहिल्या पर्वापासूनच (२००८ पासून) या स्पर्धेत वाद झाले.. त्यातून ‘कॅप्टन कूल’सुद्धा अनेकांनी ‘अँग्री यंग मॅन’ झाल्याचे अनेकांनी पाहिले. तर जाणून घेऊया आयपीएलच्या इतिहासात गाजलेले वाद आणि त्याची पार्श्वभूमी..

हरभजनने श्रीसंतच्या कानाखाली वाजवली
२००८ मध्ये चंदीगड येथे मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना झाला. त्यात मुंबई इंडिअन्सचा पराभव झाला. खेळाडू एकमेकांशी हात मिळवत असताना श्रीसंत आणि हरभजन यांच्यात वाद झाला. त्यातून हरभजन याने थेट श्रीसंतच्या कानाखाली वाजवली होती. त्यामुळे श्रीसंतला जागेवरच रडू कोसळले होते. त्यावेळी हरभजन सिंग यांच्यावरही मोठी कारवाई करण्यात आली होती.

Advertisement

शाहरुखला वानखेडेवर बंदी
केकेआरचा मालक आणि बॉलीवूड किंग शाहरुख खान यास वानखेडे स्टेडियममध्ये जाण्यास २०१२मध्ये एका सुरक्षारक्षकाने मज्जाव केला. मग काय या बादशहाचा रागाचा पारा चढला. त्याने रागाच्या भरात सुरक्षारक्षकाला जोरजोरात शिवीगाळ केली. त्यावेळी माध्यमांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले होते. अखेर शाहरुखवर सहा वर्षासाठी वानखेडे मैदानावर प्रवेशबंदी करण्यात आली होती.

गंभीर-कोहली भिडले
आरसीबी आणि केकेआर यांच्यात 2013 मध्ये मॅच झाली. चांगला खेळणारा विराट कोहली आउट झाल्यावर जल्लोष करताना केकेआरचा तत्कालीन कॅप्टन गौतम गंभीर याने विराट कोहलीला छेडले. मग शांत राहील तो कोहली कसला? लागलीच दोन्ही खेळाडू एकमेकांना भिडले. त्यावेळी केकेआरचा खेळाडू रजत भाटीया मध्ये पडला आणि मोठा अनर्थ टळला.

Advertisement

– ‘कॅप्टन कूल’ ‘अँग्री यंग मॅन’ होतो तेव्हा..
कॅप्टन कूल अशी ओळख असलेला एमएस धोनी यालाही पहिल्यांदाच मैदानावर भडकलेला पाहायला मिळाले. २०१९ मध्ये चेन्नई आणि राजस्थान यांच्यातील सामन्यादरम्यान अंपायरच्या एका निर्णयामुळे मोठा वाद झाला. भडकलेला धोनी थेट मैदानात आला व पंचाशी वाद घालू लागला. त्यामुळे त्याच्यावर 50 टक्के मॅच फी कापण्याची कारवाई केली होती.

– अश्विन-बटलर मंकडिंग
रविचंद्रन अश्विन याने राजस्थानचा बॅट्समन जॉस बटलरला ‘मंकडिंग’ करून आऊट केलं होतं. बॉल टाकण्याआधीच नॉन स्ट्रायकर एण्डवर असलेला बटलर क्रीजबाहेर आला. ही संधी साधून अश्विनने स्टम्पला बॉल लावून बटलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं. त्यामुळे मोठा वाद झाला होता.

Advertisement

– अनुष्का-गावसकरमध्ये वाद
आयपीएलच्या मागच्या मोसमात २०२० मध्ये कॉमेंट्री करताना सुनील गावसकर यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला होता. विराट कोहली याच्या खराब फॉर्मवर बोलताना गावसकर म्हणाले होते की, ‘विराटने लॉकडाऊनमध्ये अनुष्काच्या बॉलिंगचा सामना केला.’ यामुळे बराच वाद निर्माण झाला. अनुष्काने गावसकर यांचं हे वक्तव्य अपमानकारक असल्याची प्रतिक्रिया दिली. यानंतर गावसकरांना स्पष्टीकरणही द्यावं लागलं होतं.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

 

Advertisement