मार्च महिन्यातील रेकॉर्डब्रेक गरमी ठरू शकते त्रासदायक, 121 वर्षांच्या इतिहासात ‘असं’ तिसऱ्यांदा घडलं…
देशात यंदाचा मार्च महिना अतिउष्ण राहिल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने माहीती दिली आहे की, मागील 121 वर्षांमध्ये मार्च तिसरा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. हवामान विभागाने घेतलेल्या आढावा बैठकीत असं दिसलं की, मार्च महिन्यात संपूर्ण देशाचं कमाल सरासरी तापमान 32.65 डिग्री सेल्सियस होतं.
नवीन वर्षाच्या सुरुवातीस थंडी फारच कमी दिसून आली. यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये पाऊसही झाला आणि उष्णताही वाढू लागली. मार्च महिन्यात देशातील अनेक भागात तापमान 40 डिग्री सेल्सियसवर पोहोचलं होतं. यावर्षी होळी सणाच्या दिवशीही उष्णता अधिक जाणवल्याने गरमीने रेकॉर्ड मोडला आहे.
आता यावेळेस सांगायचं झालं तर मार्च महिन्यातच मे महिन्याप्रमाणेच उन्हाळा जाणवला आहे. कारण होळीच्या दिवशी दिल्लीच्या सफदरजंगमध्ये सर्वाधिक 40.1 डिग्री तापमान असल्याचं आढळलं. हे तापमान 1945 नंतर मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान ठरलं आहे. तसं महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी 40 च्या पुढे पारा गेला आहे.
हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत 1945 नंतर 76 वर्षांत पहिल्यांदाच इतकी उष्णतेची लाट पाहायला मिळाली. 29 मार्चला दिल्लीचा पारा 40 डिग्री सेल्सियसच्या पुढे गेला. यापूर्वी मार्च महिन्यात असं कधीही झालं नव्हतं, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हवामान खात्याच्या अभ्यासानुसार, विदर्भासहित (अकोला, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर व इतर) महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून विदर्भातील लोकांना तीव्र उकाड्याच्या, उष्णतेच्या त्रासाला सामोरं जावं लागेल. हवामान विभागाने तसा इशारा पुढील 24 तासांत दक्षिणपूर्व राजस्थान, तामिळनाडू आणि पूर्व विदर्भाला दिला आहे. या निरनिराळ्या भागात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहेत.
म्हणून दिवसा उन्हात फिराल तर काहीं लोकांना उष्माघातासारख्या आजारांना सामोरं जावू लागू शकतं, त्यामुळे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
🎯 इतर महत्वाच्या बातम्या :
3️⃣ घाबरू नका! तुमच्या विरोधात खोटा FIR दाखल झाला तर काय करायचं, वाचा.. 👉 https://cutt.ly/jcU31yR
4️⃣ स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या 👉 https://cutt.ly/ZcU8evg
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs