SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रोज नवा विक्रम, नगरमध्ये कोरोनाचा विस्फोट

नगर – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णसंख्येचे नवनवे विक्रम होत आहेत. कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहून जिल्हा प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. मात्र, त्यानंतरही कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही. जिल्ह्यात आज (ता. ६) कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा नवा विक्रम झाला. जिल्ह्यात तब्बल २०२० कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचेही धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे, नगर शहरात ६२२ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली. मात्र, त्यानंतरही कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही. गेल्या वर्षीपेक्षाही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज तर कोरोना रुग्णांच्या संख्येने विक्रम केला. जिल्ह्यात तब्बल ६०२० रुग्ण आढळून आले. त्यात नगर शहरात ६२२ रुग्ण आढळले आहेत.

Advertisement

नगर शहरापाठोपाठ राहाता येथे २१४, संगमनेर २०५, अकोले १६१, पाथर्डी ११७, नगर तालुका ११६, कोपरगाव १०६, श्रीरामपूर १०५, राहुरी ९०, शेवगाव ६५, नेवासे ५२, पारनेर ४७, भिंगार शहर ४५, जामखेड १८, श्रीगोंदे १०, कर्जत ५, तसेच इतर जिल्ह्यातील ३९, परराज्यातील २ आणि मिलिटरी हॉस्पिटलमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालयातील अहवालानुसार ७६३, खासगी प्रयोगशाळेत ८६०, तर अँटी जेन चाचणीत ३९७ कोरोना बाधित आढळून आले.

Advertisement

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा आदेश दिले आहेत. कोरोना नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

 

Advertisement