टाईमपास म्हणून किंवा एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी म्हणून अनेकदा गुगलचा वापर केला जातो. सहज बसल्याबसल्या आपल्याला हवी ती गोष्ट आणि तिच्या विषयी ची माहिती जाणून घेण्यासाठी आपण गुगल वर सर्फिंग सुरू करतो.
याचमधून अनेक नव्या गोष्टी आपल्याला सर्च करून कळतील असा आपला समज असतो. मात्र, काही साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या सर्च केल्या मुळे तुम्हाला जेलची हवा देखील खावी लागू शकते. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घ्या!
कस्टमर केअर
एखाद्या बँकेचा कस्टमर केअर नंबर जर तुम्ही शोधत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहे. गुगलवर हा नंबर सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकते. अनेक हॅकर्स डमी नंबर किंवा बँकेच्या वेबसाईट बनवून तुमचा डेटा चोरून तुम्हाला लाखोंचे चंदन लावू शकतात. त्यामुळे बँकेचा कस्टमर केअर नंबर मुळीच सर्च करू नका.
कुपन कोड
कूपन कोड सर्च करणे देखील महागात पडू शकते. अनेक शॉपिंगच्या वेबसाईट आपल्याला कूपन कोड देतात आणि अनेक युजर्स गुगल वर हे कुपन कोड सर्च करत बसतात. यातून तुम्ही फसवले जाऊ शकता किंवा खूप मोठ्या स्कॅम चा भाग होऊ शकता.
इमेल आयडी
गुगल वर ईमेल आयडी सर्च करणे देखील तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे तुमचे अकाउंट लिक होऊन महत्त्वपूर्ण माहिती हॅकर्स पर्यंत पोहोचू शकते. त्यातून बराच मोठा घोटाळा होऊ शकतो. याद्वारे अनेक फसवणुकीच्या प्रसंगांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. त्याच बरोबर यातून एखादा स्कॅम चा तुम्ही भाग झाला तर जेलची हवा खावी लागू शकते.
बॉम्ब बनवण्याची पद्धत
काही लोक मजेत किंवा विनोदाचा भाग म्हणून बॉम्ब बनवण्याची पद्धत गुगलवर सर्च करतात. अशा लोकांचा आयपी एड्रेस थेट सुरक्षा एजन्सी पर्यंत जाऊन त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये ही जावे लागू शकते. कारण, तुमचा यामागे हेतू कोणता होता हे जरी तुम्हाला माहित असले तरी देखील, सुरक्षा एजन्सीला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे तुमचे वर्तन अयोग्य वाटू शकते.
🎯 इतर महत्वाच्या बातम्या :
🗒️ कोरोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा टळणार का? वाचा सविस्तर 👉 https://bit.ly/39JN2kw
3️⃣ घाबरू नका! तुमच्या विरोधात खोटा FIR दाखल झाला तर काय करायचं, वाचा.. 👉 https://cutt.ly/jcU31yR
4️⃣ स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या 👉 https://cutt.ly/ZcU8evg