SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

डिग्री नसली तरी ‘Tesla’ मध्ये नोकरीची संधी; 10,000 जागा रिक्त, वाचा पुढं काय करायचं…

नोकरी कोणतीही असो, उमेदवाराला नोकरीवर घेताना पहिल्यांदा उमेदवाराने कोणती डिग्री किंवा पदवी पूर्ण केली आहे हा विचार केला जातो. पण आता टेस्ला (Tesla) मध्ये डिग्रीविना काम करण्याची अनमोल संधी मिळत आहे. या कंपनीत एक दोन नव्हे तर चक्क 10,000 रिक्त जागा भरण्याची घोषणा Tesla चे सीईओ एलन मस्क यांनी केली आहे.

यात विशेष गोष्ट ही आहे की, कॉलेज डिग्री शिवाय आता ही नोकरी उमेदवारांना मिळणार आहे, याबाबतची माहिती एलन मस्क यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली. ऑस्टिनमधील टेस्लाच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लँटमध्ये वर्ष 2022 पर्यंत 10 हजारांहून अधिक लोकांना नोकरी देण्यात येणार असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.

Advertisement

नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कॉलेज डिग्रीची गरज नसून विद्यार्थी हायस्कूल नंतर या प्लँटमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात. उद्योजक एलन मस्क यांनी याआधी जुलैमध्ये कंपनीचे कन्स्ट्रक्शन काम नवीन मॅन्युफॅक्चरिंग सुविधेसह जलद गतीने सुरू असल्याची घोषणा केली होती.

ऑस्टिन अमेरिकन स्टेटमेंट च्या एका रिपोर्टनुसार, जर टेस्लाने 10,000 पेक्षा जास्त रोजगार देणार असल्याचे सांगितले आहे, तर कंपनीकडून आधी सांगण्यात आलेल्या वर्करच्या किमान संख्येच्या दुप्पट ही संख्या असेल. यापूर्वी ही संख्या 5000 इतकी होती.

Advertisement

🎯 इतर महत्वाच्या बातम्या :

1️⃣ मार्च महिन्यातील रेकॉर्डब्रेक गरमी ठरू शकते त्रासदायक, 121 वर्षांच्या इतिहासात ‘असं’ तिसऱ्यांदा घडलं… 👉 https://cutt.ly/kcU3mIr

Advertisement

2️⃣ डिग्री नसली तरी ‘Tesla’ मध्ये नोकरीची संधी; 10,000 जागा रिक्त, वाचा पुढं काय करायचं… 👉 https://cutt.ly/ycUQEXT

3️⃣ घाबरू नका! तुमच्या विरोधात खोटा FIR दाखल झाला तर काय करायचं, वाचा.. 👉 https://cutt.ly/jcU31yR

Advertisement

4️⃣ स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या 👉 https://cutt.ly/ZcU8evg

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement