SpreadIt News | Digital Newspaper

अत्यंत दुर्दैवी! जुळ्या मुलींना जन्म देऊन आईचा कोरोनाने अंत!

0

कोरोनाने जगभर थैमान घातले, अनेक कुटुंब यातून उध्वस्त देखील झाले. काही कोरोना वॉरियर्स कुटुंब होती. तर काहीजण घरातील कर्ते… कोरोनाने त्यांच्यावर हल्ला केला आणि कुटुंब उघडी पडली. आज महाराष्ट्रातील एका घटनेने प्रत्येकाचे हृदय पिळवटून टाकले आहे.

कोरोना काळात गरोदर राहिलेल्या महिलांना अतिरिक्त काळजीची गरज आहे, हे अनेकदा सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, जेव्हा महिला प्रसुतीसाठी दवाखान्यात दाखल होते, त्यावेळी तिला आपला जीव गमवावा लागू शकतो. इथपर्यंत परिस्थिती बिघडलेली आहे.

Advertisement

पिंपरी चिंचवड येथे वाय सी एम रुग्णालयात एक 35 वर्षीय महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. प्रसुतीचे दिवस जवळ येत असल्याने तिच्या मनात धाकधुक तर होतीच मात्र, 4 एप्रिल रोजी तिला त्रास जाणवू लागल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले.

या सोबतच ऑक्सिजन लेव्हल ढासळल्याने तिची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव आल्याने घरातील प्रत्येक मंडळीला काळजी वाटू लागली. 5 एप्रिल रोजी त्या महिलेचे सिजरीयन करण्यात आले. तिने गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला. सुदैवाने दोन्ही मुलींची अँटिजन टेस्ट निगेटिव आल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Advertisement

आता सर्व कुशल मंगल आहे असे वाटत असतानाच, नुकत्याच प्रसूत झालेल्या मातेची प्रकृती आणखीनच खालावली. ‘आता लवकरच ती बरी होऊन परत येईल, मुलींचा सांभाळ करेल’ असे विचार घरच्यांचा डोक्यात असतानाच, आज सकाळी काळाने घाला केला आणि जुळ्या मुलींना त्यांची आई गमवावी लागली.

एक दिवस आईचा सहवास लाभलेल्या या जुळ्या मुलींकडे बघून प्रत्येकालाच वाईट वाटत आहे. आपल्या लेकरांना उराशी कवटाळू न शकणाऱ्या या आईला कोरोनाने तिच्या लेकरांपासून दूर नेले.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement