SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घाबरू नका! तुमच्या विरोधात खोटा FIR दाखल झाला तर काय करायचं, वाचा..

एखाद्या निर्दोष व्यक्तीने कायद्यांतर्गत आपले निर्दोषत्व सिद्ध केले तरी समाजात त्याच्याकडे गुन्हेगाराच्या नजरेने पाहिले जाते. तो आधीसारखा आदर मिळवू शकत नाही. आपल्यावरील खोटा एफआयआर टाळण्यासाठी कायद्याची काय तरतूद आहे बघुयात…

एफआयआर म्हणजे काय?

Advertisement

एफआयआर हे फर्स्ट इन्फोर्मेशन रिपोर्टचं छोटं रूप आहे. समजा एखादा गुन्हा घडला, तर तेव्हा ज्यांच्यासोबत गुन्हा घडला आहे तो पोलिसांना कळवतो याला एफआयआर म्हणतात.

एखाद्या घटनेची तोंडी माहीती पोलिसांना सांगून लिखित स्वरुपात बदलली जाते तेव्हा ती एफआयआर असते.
फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या कलम 154 अंतर्गत पोलिसांना दखलपात्र गुन्हा असलेल्या प्रकरणात एफआयआर दाखल करावा लागतो.

Advertisement

तुमच्यावर खोटा एफआयआर दाखल केल्यास..?

परंतु खोटे एफआयआर दाखल होण्याविरूद्ध काही मार्ग आहेत, जसे की फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या कलम 482 असा कायदा आहे ज्याचा उपयोग अशा हेतुपरस्पर घटनांपासून लांब राहण्यासाठी केला जाऊ शकतो.

Advertisement

फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482-

या कलमाच्या अंतर्गत वकीलाद्वारे उच्च न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात. ज्या व्यक्तीवर एफआयआर दाखल झाला आहे ती व्यक्ती त्याच्या निर्दोषपणाचा पुरावा देऊ शकते. म्हणजे, फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482 नुसार ती व्यक्ती दाखल झालेल्या एफआयआरला आव्हान देऊ शकते आणि उच्च न्यायालयात न्याय मिळण्याची मागणी करू शकते.

Advertisement

फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482 च्या अंतर्गत अर्ज दाखल करायचा असेल, तर व्यक्ती उच्च न्यायालयात पुढील अनेक प्रकारे आधार घेऊन अर्ज दाखल करू शकते आणि खोटे एफआयआर रद्द करू शकते..

जर खोटा एफआयआर दाखल केला तर

Advertisement

जो गुन्हाच झालेला नाही त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला असेल तर

एफआयआरमध्ये आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप असेल तर

Advertisement

जर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असेल तर तो दखलपात्र गुन्हा असतो आणि किरकोळ स्वरूपाचा गुन्हा अदखलपात्र समजतात. जर गुन्हा दखलपात्र असेल तर पोलीस त्या गुन्ह्यास लेखी स्वरूप देऊन, पोलीस तक्रार देणाऱ्याला ते वाचून दाखवतात. तसेच त्यावर तक्रारकर्त्याची सही घेऊन त्याची प्रत मोफत देण्याचे बंधन कायद्याने पोलिसांवर आहे.

हे ही वाचा : डिग्री नसली तरी ‘Tesla’ मध्ये नोकरीची संधी; 10,000 जागा रिक्त, वाचा पुढं काय करायचं: https://cutt.ly/ycUQEXT

Advertisement

जर अशी तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस दुर्लक्ष अथवा टाळत असतील तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते आणि अधिकाऱ्याला त्याची नोंद घेत तपास सुरु करावा लागतो. तसेच, उच्च न्यायालयात अर्ज नाकारल्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागू शकतो.

जर कोणी आपल्या विरूद्ध खोटा एफआयआर करत असेल तर आपण त्याच्या विरुद्ध न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482 अन्वये एक अर्ज द्याल, तेव्हा न्यायालय निर्णय देईपर्यंत पोलिस आपल्या विरुद्ध कारवाई करू शकत नाही आणि आपल्याला अटक करू शकत नाही.

Advertisement

जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीविरूद्ध खोट्या एफआयआर दाखल केला असेल तर अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीने संविधानच्या अनुच्छेद 226 च्या अंतर्गत एक रिट याचिका दाखल करू शकतो ज्याद्वारे खोटा एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात तुम्ही अर्ज देऊ शकता.

🎯 इतर महत्वाच्या बातम्या :

Advertisement

1️⃣ मार्च महिन्यातील रेकॉर्डब्रेक गरमी ठरू शकते त्रासदायक, 121 वर्षांच्या इतिहासात ‘असं’ तिसऱ्यांदा घडलं… 👉 https://cutt.ly/kcU3mIr

2️⃣ डिग्री नसली तरी ‘Tesla’ मध्ये नोकरीची संधी; 10,000 जागा रिक्त, वाचा पुढं काय करायचं… 👉 https://cutt.ly/ycUQEXT

Advertisement

3️⃣ घाबरू नका! तुमच्या विरोधात खोटा FIR दाखल झाला तर काय करायचं, वाचा.. 👉 https://cutt.ly/jcU31yR

4️⃣ स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या 👉 https://cutt.ly/ZcU8evg

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement