SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतीय जवानांना घेरून गोळीबार करणारा नक्षलवाद्यांचा कमांडर हिडमा कोण आहे? जाणून घ्या..

छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीची घटना भयानक नक्षलवादी हिडमाच्या पुवर्ती गावाजवळ घडली आहे. या चकमकीत 22 भारतीय जवान शहीद झाले असून 31 जवान जखमी झाले आहेत. मागील काही दिवसांत भारतीय सुरक्षा दलांवर नक्षलवाद्यांकडून झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.

या भयानक चकमकीपूर्वी नक्षलवाद्यांनी भारतीय जवानांना रणनीती आखून जंगलामध्ये येऊन दिले. 300 ते 400 नक्षलवाद्यांनी चारही बाजूने घेरत भारतीय जवानांच्या एका तुकडीच्या भारतीय जवानांवर गोळीबार केला. नक्षलवाद्यांचा कमांडर हिडमा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची तुफान चर्चा आहे.

Advertisement

कोण आहे हिडमा उर्फ हिडमन्ना?

कमांडर हिडमाविषयी भारतीय सुरक्षा दलांकडे अधिक माहीती नाही. सुरक्षादलांकडे असलेले त्याचे छायाचित्रही तरुणपणातील आहे. त्यामुळे कमांडर हिडमा आत्ता नेमका कसा दिसतो, हे माहिती नाही. पण, सुरक्षादलांच्या अंदाजानुसार कमांडर हिडमा साधारण 40 वर्षांची व्यक्ती आहे. हिडमाचे खरे नाव हिडमन्ना असून तो सुकमा जिल्ह्यातील पूवर्ती गावाचा रहिवासी आहे. तो पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा प्रमुख आहे. या दलात जवळपास 250 नक्षलवादी सामील आहेत. नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीमध्ये या हिडमाच्या गटाचा समावेश आहे.

Advertisement

या कमांडर हिडमाला पकडण्यासाठी 40 लाखांचे इनामही घोषित करण्यात आले आहे. हिडमा हा नक्षलवाद्यांच्या PLGA बटालियन 1 चे नेतृत्त्व करतो. पामेड, कोंटा, जगरगुंडा, बासगुडा हा परिसर या बटालियनच्या अखत्यारित येतो. 1990 मध्ये हिडमा माओवाद्यांमध्ये सामील झाला आणि लवकरच नक्षलवादी संघटनेचे एक मोठे नाव बनला. 2010 मध्ये ताडमेटला येथे झालेल्या हल्ल्यात सोल्जर्स 76 सैनिकांच्या मृत्यूमध्ये हिडमा महत्त्वपूर्ण ठरली होती. 2013 च्या झिरम हल्ल्याचा तो सूत्रधार मानला जात आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement