गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर पोलिसांना २०० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिल्याचा आरोप केला होता. हा आरोप भोवल्याने अखेर देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सोशल मीडियावर फराह खान ट्रोल
मुंबईतील रस्त्यावर थांबून काही दिवसांपूर्वी फराह खान हिने आंबे खरेदी केले. अगदी तोंडावरील मास्क काढून तिने आंब्याचा वास घेतला. मात्र, कुणीतरी गुपचूप तिचा हा व्हिडीओ शूट केला नि सोशल मीडियावर टाकला. प्रचंड वेगाने हा व्हिडीओ व्हायरल झाला. महाराष्ट्रात कोरोना संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असताना, फराह खान हिने आंब्याचा वास घेण्यासाठी मास्क काढल्याने सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला.
शेअर बाजारात घसरण, सोन्या-चांदी झाले स्वस्त
डॉलरच्या वाढीमुळे शेअर बाजारात आज घसरण झाली. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरातही घसरण झाली. देशाच्या राजधानीत 15 रुपयांची निव्वळ घसरण होऊन सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ४४,९४९ रुपयांवर घसरले. तसेच, चांदीच्या दरातही राजधानीमध्ये 216 रुपयांची घसरण होऊन ६४,२२२ रुपये प्रतिकिलो झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांवर येणार नवी मालिका
छत्रपती शिवाजी महाराजांवर स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या २ मेपासून नवी मालिका सुरु होत आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अभिनेता भूषण प्रधान साकारणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात दमदार परफॉर्मन्स सादर करून भूषण प्रधान याने या नव्या मालिकेविषयी माहिती दिली.
ग्राहकांना मिळणार स्वस्तात टाटा स्कायची सेवा
टाटा स्काय एचडी सेट टॉप बॉक्स ग्राहकांसाठी स्वस्तात उपलब्ध झाला असून, त्यावर चक्क ४०० रुपयांची सूट मिळत आहे. ही सवलत टाटा स्काय बिंज आणि टाटा स्काय सेट टॉप बॉक्सवर मिळणार आहे. त्यात अनेक उत्कृष्ट फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत.
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs