SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📎 महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

◼️’अनिल देशमुखांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा स्वीकारावा, तसेच हे पद दिलीप वळसे-पाटील यांना देण्यात यावे’ असे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद; दिलीप वळसे पाटील हेच गृहमंत्री होणार यावर जवळजवळ झाले शिक्कामोर्तब!

◼️ गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील घडामोडींची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; रामदास आठवले यांची मागणी

Advertisement

◼️कोरोनाचा विस्फोट पाहता 5200 वैद्यकीय अधिकारी आणि 15 हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे होणार शक्य; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती!

◼️मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात झूम ॲपद्वारे चर्चा; राज्यातील लॉकडाऊनवर चर्चा झाल्याची माहिती मात्र, अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या चर्चेमुळे गूढ वाढलं!

Advertisement

◼️ कोरोनाचा एक रुग्ण सापडला तर आजूबाजूची 20 घरे होणार सील; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा नवा निर्णय!

◼️स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021 मध्ये ‘आई कुठे काय करते’ ठरली सर्वोत्कृष्ट मालिका!

Advertisement

◼️माजी गृहमंत्री देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; आपल्या विरुद्ध सीबीआय चौकशीचा दिलेल्या आदेशाला रद्द करण्यासाठी अपील

◼️औरंगाबादमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन असल्याचा तज्ञांचा दावा; 8 दिवसात 75 बालकांना झाली लागण, बाधितांमध्ये तरुण वर्गाचे प्रमाण 50 टक्के!

Advertisement

◼️दीपिका पदुकोण निर्मित ‘द इंटर्न’ या भारतीय ऍडपटेशन असलेल्या शॉर्ट फिल्म मध्ये दीपिका सोबत दिसणार बिग बी; दीपिका पदुकोण निभावणार अभिनेत्री आणि निर्माती अशा दोन्ही जबाबदाऱ्या

Advertisement