शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे, सोन्या-चांदीचे दर नेमके किती झाले आहेत? आणि आपण केलेली गुंतवणूक व्यवस्थित आहे की नाही? याविषयी तुमच्या मनात प्रश्न असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.
डॉलरच्या वाढीमुळे शेअर बाजारात घसरण झाली यामुळे सोन्या-चांदीचे दर देखील स्वस्त झाले आहेत. देशाच्या राजधानीत 15 रुपयांची निव्वळ घसरण होऊन सोन्याचा दर सध्या प्रति दहा ग्रॅम 44949 रुपयांवर बंद झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याची घसरण होताना पाहायला मिळत आहे. जून डिलीव्हरीसाठी सोन्याचे दर प्रति औंस 1,724.35 डॉलर होते, ते 4.05 डॉलरने (-0.23%) घसरले. एमसीएक्सवर दुपारी 3.40 वाजता जून डिलिव्हरीचे सोने प्रति 10 ग्रॅम 143 रुपयांनी घसरून 45275 रुपये आणि ऑगस्टच्या डिलीव्हरीचे सोने 99 रुपयांनी घसरून 45526 रुपयांवर गेले.
चांदीच्या दराबाबत बोलायला गेल्यास राजधानीमध्ये 216 रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर 64,222 रुपये प्रतिकिलो झाले.
गेल्या काही काळासाठी डॉलर सतत वाढत आहे. सध्या डॉलर निर्देशांक 93.09 च्या पातळीवर आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर 217 पैशांनी वधारून 73.33 वर बंद झाला. आज शेअर बाजारात मोठी घसरण नोंदली गेली. कोणाच्या वाढता प्रकरणांमुळे कच्च्या तेलाच्या किमती मध्ये देखील मोठी घसरण पाहायला मिळाली.
दुपारी 3.45 वाजता कच्चे तेल प्रति बॅरल 1.36 डॉलरच्या घसरणीसह (-2.10%) 63.50 डॉलर प्रति बॅरेलवर व्यापार करीत होता. त्याचप्रमाणे यूएस डब्ल्यूटीआय क्रूड 1.25 (-2.03%) घसरणीसह प्रति बॅरल 60.20 डॉलरवर व्यापार करीत होता.
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs