SpreadIt News | Digital Newspaper

सचिन वाझेंनी आणला नवा ट्विस्ट, एनआयएनेच रचला बनाव

0

मुंबई : मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ झालीय. त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर केलं. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवसांतच गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. पोलिस दलातून त्यांना लगेच निलंबित केलं गेलं.

वाझेंच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. त्यावेळी वाझे यांनीही युक्तिवाद केला. त्यांनी एनआयएवरच खळबळजनक आरोप लावला. मुंबईची मिठी नदी अठरा किलोमीटर लांबीची आहे. तेथेच साहित्य कसं सापडलं. त्यामुळे हे साहित्य म्हणजे एनआयएचा बनाव आहे. मी ह्रदयरोगी आहे. आताच एक अॅटॅक येऊन गेलाय. त्यामुळे कोठडी वाढवू नका, असा त्यांचा युक्तिवाद होता.

Advertisement

न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यासमोर वाझे यांना हजर केलं होतं. मिठी नदीच्या गाळात कॉप्युटर, लॅपटॉप, हार्ड डिस्क, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, गाडीच्या नंबर प्लेट्स साहित्य सापडलं. एनआयएने सांगितलं, डीसीबी बँकेत वाझेंचे एका व्यक्तीसोबत जॉईंट अकाउंट आहे.

वाझेंना अटक झाल्यानंतर त्यातून २६ लाख ५० हजार रूपये काढले. त्यात फक्त 5 हजार रूपये उरले आहेत. वाझे म्हणाले, माझं असं कोणतंही जॉईंट अकाउंट नाही. त्याच लॉकरमधून काही कागदपत्रही गायब झालीत. वाझे यांनी नेमकी कोठून स्फोटके आणली. ते कोणा-कोणाला भेटले. त्यांच्या हालचाली काय होत्या. या विषयी तपास करायचा असल्याने एनआयएने त्यांनी पोलिस कोठडी वाढवली.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement