SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आंबे खरेदी आली अंगलट, सोशल मीडियावर फराह खान ट्रोल!

मुंबई – आंबा फळांचा राजा.. कोकणच्या या राजाने नेहमीच अनेकांना भुरळ घातलीय.. मग तो गरीब असो वा श्रीमंत. राव असो वा रंक. लहान असो वा थोर. झोपडपट्टीत राहणारा असो वा महालात.. त्यातून आपली बॉलीवूड नगरीही सुटलेली नाही. चित्रपट निर्माती फराह खान हिलाही या राजाचा मोह आवरला नाही. मात्र, हा मोह तिला भलताच महागात पडला. सोशल मीडियावर फराह खानला अनेकांनी ट्रोल केलं. कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. फराह खान हिने असं काय केलं होतं? कशामुळे तिला या प्रकाराला सामोरे जावं लागलं? नेमकं काय झालं होतं, जाणून घेऊ या..

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Advertisement


..तर त्याचं झालं असं.. मुंबईतील रस्त्यावर थांबून काही दिवसांपूर्वी फराह खान हिने आंबे खरेदी केले.. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय एवढं..? पण कोणीतरी गुपचूप तिचा हा व्हिडीओ शूट केला नि सोशल मीडियावर टाकला. प्रचंड वेगाने हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ होताही काहीसा मजेशीर. मात्र, अनेकांनी व्हिडीओ पाहून फराह खान हिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींना नवल, तर काहींना आश्चर्य वाटलं. व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला.

 

Advertisement

अखेर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर फराहची नजर पडली. मीडिया फोटोग्राफर्सलाच तिने ‘हा व्हिडीओ कोणी शूट केला,’ असे थेट सवाल केला. तिचा प्रश्न ऐकून लागलीच साऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले. “तुमचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. तुम्हाला आवडला का, असा प्रश्न त्यांनी केला. फराहलाही हसू आवरले नाही. हसत हसत सगळ्यांना बाय बाय करीत ती तेथून निघून गेली.

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Advertisement


काय होतं व्हिडीओमध्ये?
रस्त्यावर आंबे खरेदी करताना फराह खान फळविक्रेत्यासोबत बार्गेनिंग करताना दिसत आहे. ती एवढ्यावरच थांबत नाही, तर अगदी चेहऱ्यावरचा मास्क काढून आंब्यांचा वास घेतानाही दिसते. “चांगले आंबे दे रे बाबा…” असं ती फळविक्रेत्याला बजावते. फराह खान हिच्या अंगावर टी-शर्ट व पँट असून, या लूकमध्ये ती खूपच छान दिसत आहे. तोंडाला तिने मास्कदेखील लावला आहे, पण आंब्यांचा वास घेताना मास्क काढल्याने सोशल मीडियावर तिला ट्रोलला सामोरे जावं लागले. ​

’मास्क काढून असं कोणी आंब्यांचा वास घेतं का..?’ ‘कॉमन सेन्स विकून आंबेखरेदी केले का?’ असं एका युझरने म्हटलं आहे. दुसऱ्याने लिहिलं आहे, की ‘अखेर इन्फेक्शन नाकापर्यंत पोचलंच की..’ तर आणखी एकानंही फराहवर टीका करताना म्हटलं आहे, की ‘असंच वागायचं, तर मग मास्क वापरण्याचा फायदाच काय?’

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement