SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

छत्रपती शिवाजी महाराजांवर स्टार प्रवाहवर येणार नवी मालिका; हा अभिनेता साकारणार छत्रपतींची भूमिका!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित मालिका ही नेहमीच महाराष्ट्रासाठी आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असते.

याआधी अशा मालिका विविध वाहिन्यांवर आल्या, त्याला प्रेक्षकांनी खूप उत्तम प्रतिसादही दिला. आता स्टार प्रवाह वर ‘जय भवानी जय शिवाजी’ या नावाने एक नवी मालिका सुरू होणार आहे.

Advertisement

या मालिकेमध्ये महाराजांची भूमिका भूषण प्रधान हा मराठी अभिनेता साकारणार आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात त्याने शिवाजी महाराजांवरील एक परफॉर्मन्स सादर करून, या नव्या मालिकेविषयी माहिती सांगितली. ही मालिका 2 मे पासून स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Advertisement

या मालिकेसाठी केले ते कष्ट आणि संपूर्ण प्रवास अगदी मेकअप कॉस्च्युम इथपासून ते इतिहासातील महान युद्धाच्या रुपात स्वतःला परावर्तित करताना त्याला काय तयारी करावी लागली, याविषयी त्याने आपले मत व्यक्त केले.

ही तयारी फार आधीपासून सुरू झाली असून स्क्रिप्टवर देखील सुरुवातीपासूनच काम सुरू होते असेही त्याने सांगितले. याआधी भूषण ने टेलिव्हिजनवर ‘पिंजरा’ ही मालिका केली होती. यानंतर टेलिव्हिजनवर त्याने फारसे काम केले नाही.

Advertisement

त्या आधी मात्र, त्याने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले होते. ‘पिंजरा’ नंतर तो चित्रपटांकडे वळला आणि मध्येच झी फाईव वरील ‘गोंद्या आला रे’ हि वेबसिरीज त्याने केली.

Advertisement