SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बँकेने खराब किंवा फाटलेल्या नोटा दिल्या तर बँकांनाच द्यावा लागणार दंड; जाणून घ्या सविस्तर..

बँकेने ग्राहकांना खराब किंवा फाटलेल्या नोटा दिल्या तर बँकांना आता मोठा दंड भरावा लागणार आहे. यामुळे 100 रुपयांपर्यंतच्या खराब किंवा फाटलेल्या नोटेला रकमेव्यतिरिक्त 50 ते 100 रुपयांचा दंड बँकांना भरावा लागेल.

कारण क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार एप्रिलपासून लागू झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या परिपत्रकात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, बँका एका महिन्यामध्ये दंडाविरूद्ध अपील करू शकतात. परंतु, कर्मचारी नवीन, प्रशिक्षण नसलेले, अपूर्ण माहीती, सुधारात्मक उपाययोजना किंवा युक्तिवादावर दंड माफी यासारख्या गोष्टीवर दंड कमी होणार नाही.

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणत्याही तडजोडी न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. खराब किंवा फाटलेल्या नोटा दिल्यास दंड त्वरित वसूल केला जाईल. प्रत्येक अनियमिततेसाठी 5000 रुपये दंड भरावा लागेल. तसेच तिच चुक पुन्हा केल्यास दंडाची रक्कम दुप्पट होईल.

5 तक्रारींवर 5 लाखांचा दंड –

Advertisement

खराब किंवा फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्यास नकार दिल्याच्या पाच तक्रारी असलेल्या बँकेला त्वरित 5 लाख रुपये दंड भरावा लागेल. नाणी जमा न केल्याबद्दल किंवा न दिल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकेकडून 1 लाखांचा दंड वसूल करेल. 50 रुपये किंवा त्यापेक्षा कमी नोटा घेण्यास नकार देणारी बँक शाखेलादेखील याच प्रकारात दंडाची रक्कम ठेवण्यात आली आहे.

..तर बँकांना बक्षीस मिळणार

Advertisement

ग्राहक सेवा सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून फाटलेल्या आणि खराब नोटा शक्य तितक्या बदलण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. 50 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलण्यासाठी प्रत्येक पॅकेटसाठी 2 रुपये मिळतील. तसेच फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी प्रति नोट 2 रुपये एक्सचेंज रक्कम देण्यात येईल.

बनावट नोटा हटविणे हा एक गंभीर गुन्हा

Advertisement

बनावट नोटा घोटाळ्यात बँकांची देखरेख व जबाबदारी वाढवली गेली आहे, यासाठी बँकांच्या मुख्य कार्यालयात बनावट नोट दक्षता कक्ष तयार करण्यात येईल, त्याद्वारे बँक शाखेत येणाऱ्या प्रत्येक बनावट नोटांचा हिशेब ठेवला जाईल. बँका बनावट नोटांची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो तसेच फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट म्हणजे एफआययूला देईल. बनावट नोटा हटविणे किंवा ग्राहकाला परत करणे याची एक गंभीर गुन्हा म्हणून नोंद होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement