SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन जाहीर!

अखेरीस लॉकडाऊन लागणार की नाही यावर महाराष्ट्राचे डोळे लागलेले असताना आज निर्णय झाला असून महाराष्ट्रात लॉकडाऊन ऐवजी विकेंड लॉकडाऊन म्हणजेच फक्त शनिवारी-रविवारी लॉकडाऊन असेल.

शुक्रवारी रात्री 8 ते समोवर सकाळी 7 वाजेपर्यंतचा हा वेळ असेल ज्या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असतील. आठवड्यातील इतर दिवशी मात्र कडक निर्बंध असतील.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली.

राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.

Advertisement

नवाब मलिक म्हणाले, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून ही नियमावली लागू होईल. रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी असेल. इतर वेळी जमावबंदी आदेश लागू असतील. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल. हा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

Advertisement

महत्वाचे मुद्दे –

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

Advertisement

दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी राहणार

गृहनिर्माणची सर्व कामे सुरू

Advertisement

भाजी मंडई बंद राहणार

बार हॉटेल मॉल बंद राहणार

Advertisement

सर्व मैदाने आणि सभागृह बंद राहणार

ऑफिस50 % क्षमतेने सुरू

Advertisement

सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार

उद्याने समुद्रकिनारे चित्रपटगृह बंद

Advertisement

दुकान आणि हॉटेल मध्ये पार्सल सेवा सुरू राहणार

रिक्षा टॅक्सी खाजगी बसेस सुरू राहणार

Advertisement

मुंबई लोकल वाहतूक सुरू राहणार

सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, मास्क बंधनकारक, क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

Advertisement

इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही

दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत.

Advertisement


💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement