राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर
राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. तसेच राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र जिल्हाबंदी नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारच्या उपाययोजना जाहीर, वाचा काय सुरू, काय बंद?
▪️विकएंडला म्हणजे शुक्रवारी रात्री 8 पासून सोमवार सकाळी 7 पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन.
▪️आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु. किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.
▪️वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद. पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक.
▪️केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील
▪️मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
▪️सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र या ठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल.
▪️उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. मात्र टेक-अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील.
▪️कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील.
▪️शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील.
▪️दिवसा जमावबंदी. राज्यात 144 कलम लागू.
▪️वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे.
▪️शाळा- महाविद्यालये, खाजगी क्लासेस बंद राहतील. मात्र 10 व 12 परीक्षांचा अपवाद असेल.
▪️उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील.
▪️चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक
▪️कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी कामावरुन काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी पगारी रजा द्यायची आहे.
▪️5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार.
▪️सार्वजनिक व खासगी बसेस तसेच ट्रेनमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही.
भाजपचा राज्यसरकारला पाठिंबा
कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊन अर्थात शनिवार-रविवारी लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपाचा पाठिंबा असून जनतेने देखील पाठिंबा द्यावा, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयला पाठिंहा द्यावा तसेच लसीकरणाच्या मोहिमेत मदत करावी, असं आवाहन त्यांनी केलं
3 ipl खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र, यापूर्वीच विविध संघांच्या एकूण 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोलकाता नाइटरायडर्सचा खेळाडू नितीश राणा, दिल्ली कॅपिट्लसचा अक्षर पटेल आणि रॉयल चॅलेंजेर्स बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.
अभिनेत्री शशिकला यांचं निधन
प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे आज दुपारी वयाच्या 88 व्या वर्षी मुंबईतील कुलाबा येथील घरी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणे बंद केले होते.
पुण्यातील गहुंजे स्टेडियम परिसरात बिबट्या?
अलिकडे भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिक खेळल्या गेलेल्या पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम आणि साई नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही जणांनी बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे. स्टेडियमच्या पाठीमागे डोंगराळ भाग असून निर्मनुष्य परिसर आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं काही जनांनी म्हटलं आहे
अभिनेता अक्षय कोरोना पॉझिटिव्ह
आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला करोना झाल्याचे समोर आले आहे. सध्या अक्षय होम क्वारंटाइन आहे. अक्षयने ट्विट करत करोना चाचणी पाझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. “मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आज सकाळी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे.
नक्षलवाद्यांनी केली माजी उपसारपंचाची हत्या
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथे माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते रामा तलांडी (३७) यांची शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास १० ते १५ नक्षल्यांनी गोळी झाडून हत्या केली. अचानक करण्यात आलेल्या गोळीबारात तलांडी यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक रामा तलांडी हे बुर्गी ग्रामपंचायतमध्ये १० वर्ष उपसरपंच होते होते. बुर्गी येथे लग्न समारंभ होता. तिथे डीजे लावत असताना साध्या वेशात दहशतवादी आले आणि त्यांनी रामा तलांडी यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर नक्षली जंगलात पसार झाले.
वाघ्या-मुरळीला अडवून मुरळीवर अत्याचार
जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडलीये. नगरजवळच्या निबोंडी गावात शुक्रवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. महिलेवर अत्याचार करून त्यांच्याकडील नऊ हजार रुपये काढून घेऊन आरोपी पळून गेले. तिन्ही आरोपी शेतात काम करणारे मजूर आहेत.
या विविध घडामोडी खलील व्हाट्सएपच्या बटनावर क्लिक करून नक्की शेअर करा
इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: www.spreaditnews.com
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs