कोरोनाची सद्य परिस्थिती पाहता काही सेवा हळूहळू बंद करण्याचा, काही भागांत कठोर निर्बंध लादून कोरोनाची साथ रोखण्याचा प्रयत्न सरकारने केला. मात्र, लोक ऐकत नाहीत, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण पाहता राज्यात कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मत आरोग्यमंत्र्यांनी मांडले.
मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमे, व्यायामशाळा चालक, मराठी नाटय़ निर्माता संघ तसेच त्यानंतर राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले..
▪️ ‘हे बंद करा, ते बंद करा’, ही आपली भूमिका नाही. परंतु येणाऱ्या वाईट परिस्थितीवर आताच मात करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागतील.
▪️ ‘जिंदगी, जान उसके बाद काम’ आणि जान है तो जहान है..’अशा वाक्यांतून मुख्यमंत्री ठाकरे यांनी टाळेबंदीसारखा उपाय जवळजवळ निश्चितच असल्याचेच अधोरेखित केले. तसेच राज्य सरकारला सहकार्याचे आवाहनही केले.
▪️ लॉकडाऊन हा उपाय नाही; पण दृश्य स्वरूपात बदल दिसले नाहीत आणि काही वेगळा उपाय मिळाला नाही, तर पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
▪️ विविध क्षेत्रांतील मान्यवर, तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. संपादकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी लॉकडाऊन अटळ असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
▪️ अन्य राज्यांमध्ये काय सुरू आहे, यावर मी बोलणार नाही. राज्यात 24 -25 कोटी लशींची मात्रा आवश्यक आहे. ती येईपर्यंत आपल्याला खबरदारी घ्यावीच लागेल. मला महाराष्ट्रातील जनतेचा जीव मोलाचा आहे, असे पुन्हा एकदा स्पष्ट सांगितले.
▪️ राज्य सरकार कुठलेही आकडे लपवत नाही. सर्व खरी माहिती दिली जात आहे, माध्यमांनीही जनजागृती करून कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्याचा निर्धार करावा.
▪️ ही लढाई एकटय़ा सरकारची नाही तर तुम्हाआम्हा सर्वाची आहे. कोरोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको तर एकमेकांची योग्य काळजी कशी घ्यावी, याबाबत समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे, याबाबत माध्यमांनी सहकार्य करावे.
कोणत्या उपायांवर झाली चर्चा
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीचे उपाय, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर, टेलिमेडिसिन, सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन, कामाच्या वेळांची विभागणी, स्थानिक पातळीवर साथ नियंत्रणाला प्राधान्य, दुकानदार-विक्रेते यांच्या चाचण्या करून त्यांना वस्तू विक्रीची परवानगी या काही उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली.
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs