SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गॅस बुकिंग आता WhatsApp वर!

व्हॉट्सअ‍ॅपने आजच्या तंत्रज्ञानात, प्रगती केलेल्या जगात आपले मोलाचे कार्य केले आहे. पैसे पाठवणे असो, गप्पागोष्टी असो, व्हिडीओ-ऑडिओ कॉलिंग असो किंवा अन्य गोष्टी असो, त्याबद्दल आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर सहजपणे माहिती मिळते.

आता आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर एलपीजी सिलिंडरही बुक करता येणार आहे. म्हणजे आपण मस्त घरबसल्या, कुठलीही बाहेर जाण्याची तसदी नाही अशा परिस्थितीत काही मिनिटांतच सिलिंडर ऑर्डर करू शकाल. इंडेन आणि एचपी गॅस हे दोन्ही व्हॉट्सअ‍ॅपवरुन सिलिंडर बुक करण्याची उत्तम सुविधा देतात. याप्रकारे आपण एलपीजी सिलिंडरचा दिलेला नंबर सेव्ह करुन एलपीजी सिलेंडर बुक करू शकता.

Advertisement

इंडेन युजर्स असाल तर…

▪️ कॉल करून बुकिंग करण्यासाठी आणि तुम्ही जर इंडेनचे ग्राहक असाल तर 7718955555 वर आपले सिलिंडर बुक करू शकता.

Advertisement

▪️ व्हॉट्सअ‍ॅपवरुन बुकिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावरून 7588888824 वर रिफिल (REFILL) लिहून मेसेज पाठवा आणि त्यानंतर तुम्हाला बुकिंगची माहिती मिळेल.

▪️ एसएमएसद्वारे एलपीजी गॅस सिलिंडरदेखील बुक करू शकता. यामध्ये तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) येईल. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला दाखवून तुम्ही सिलिंडर मिळवू शकता.

Advertisement

एचपी गॅस युजर्स असाल तर…

▪️ आपण एचपी गॅस सिलिंडर बुक करू इच्छित असल्यास प्रथम आपल्या फोनमध्ये 9222201122 नंबर सेव्ह करा.

Advertisement

▪️ त्यानंतर या क्रमांकाचा चॅट बॉक्स उघडा आणि ‘BOOK’ असं टाईप करुन मेसेज पाठवा. यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल व तुमचे गॅस सिलिंडर बुक केले जाईल.

▪️ तसेच तुम्हाला इतर एलपीजी (LPG) कोटा, एलपीजी(LPG) आयडी, एलपीजी (LPG) सबसिडी या बाबींविषयीची माहिती मिळण्यासाठी मदत होईल.

Advertisement

भारतगॅस सिलिंडर ‘असा’ करा बुक..

▪️ जर आपल्याला भारतगॅस सिलेंडर बुक करायचे असेल तर आपल्याला आपल्या फोनमध्ये 1800224344 नंबर सेव्ह करावा लागेल.

Advertisement

▪️ तुम्ही तुमचं व्हॉट्सअ‍ॅप ओपन करुन हा नंबर ओपन करा आणि मग बुक ‘BOOK किंवा 1’ असं लिहून मेसेज पाठवा. मग नंतर आपले सिलिंडर बुक केले जाईल आणि तुमच्या व्हॉट्सअपवर एक पुष्टीकरण मेसेज (गॅस सिलिंडर बुक झाल्याचा) येईल.

▪️ लक्षात ठेवा की आपल्याला केवळ आपल्या नोंदणीकृत क्रमांकावरून संदेश पाठवावा लागेल.

Advertisement

स्टेटस पाहण्यासाठी ‘असं’ करा..

जर आपले गॅस सिलिंडरचे बुकिंग झाले आहे आणि आपल्याला स्टेटस माहीत करून घ्यायचा असेल तर व्हॉट्सअप सेवेवरही ही सुविधा उपलब्ध आहे. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला STATUS # टाईप करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला आरक्षित क्रमांक मिळेल जे तुम्हाला बुकिंगनंतर मिळेल.

Advertisement

उदाहरण म्हणून समजून घ्या..

समजा, जर आपला बुकिंग क्रमांक 12345 असेल तर आपणास STATUS # 12345 आणि 7588888824 क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा लागेल. महत्वाचं म्हणजे STATUS # आणि ऑर्डर नंबरमध्ये कोणतीही स्पेस (रिकामी जागा) द्यायची नाही.

Advertisement


💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement