SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या एका नजरेत

🔥 उत्तराखंडमध्ये पुन्हा आपत्ती: 1200 हेक्टरहून अधिक क्षेत्र खाक

▪️चामोलीत भीषण जलप्रलय अनुभवलेल्या उत्तराखंडवर आता वणव्याचे संकट, जंगलातील शहरांना झळा, जवळपास 1200 हेक्टर वन क्षेत्र जळून खाक

Advertisement

▪️ वरुणावत पर्वतावर लागलेली आग उत्तरकाशी आणि गढवालच्या चौरासेमधील आग श्रीनगरपर्यंत पोहोचू लागल्याने इशारा, नैनितालमधील 20 जंगलांतही वणवा

💥 छत्तीसगढमध्ये नक्षली हल्ला: 21 जवान अद्यापही बेपत्ता

Advertisement

▪️ 5 शहिदांमधून 2 जणांचा मृतदेह ताब्यात, 21 जवान अद्यापही बेपत्ता; 700 जवानांना घेरुन नक्षल्यांनी केला होता हल्ला; नक्षलवाद्यांनी जवानांवर तिन्ही बाजूंनी केला होता गोळीबार

😱 फेसबुक डेटा लीक प्रकरण: 50 कोटी युजर्सची खासगी माहिती लीक

Advertisement

▪️ 50 कोटी लोकांचे फोन नंबरसारखे तपशील इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध-हॅकरचा दावा, तज्ञ म्हणाले, वापरकर्त्यांनी आणखी सावधगिरी बाळगली पाहिजे; फेसबुकचे स्पष्टीकरण, ‘हा डेटा खूप जुना!’

😷 बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

Advertisement

▪️ घरीच क्वारंटाईन होण्याचा घेतला निर्णय, रविवारी सकाळी रिपोर्ट आला पॉझिटिव्ह; सोशल मीडियावर फॅन्सला काळजी घेण्याची केली विनंती

👊 संजय राऊतांचा आनंद महिंद्राना शाब्दिक टोला

Advertisement

▪️ ‘आनंद महिंद्रांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध केला, पण मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळ्या पिटण्याचा आनंद साजरा केला होता’, संजय राऊत बरसले

🎭 सुपरस्टार विजयच्या ‘मास्टर’चा रिमेक, सलमान खान करणार?

Advertisement

▪️ ‘मास्टर’चा रिमेक हा कबीर सिंग चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी आणि एन्डेमोल शाइन करणार, सलमानची गेल्या 30 दिवसांपासून ‘मास्टर’विषयी चर्चा करण्यासाठी अनेकदा भेट; विजयची भूमिका बॉलिवूडचा भाईजान सलमान खान साकारणार असल्याच्या चर्चा

❄️ भारत कोरोना आकडेवारी: आज 04 एप्रिल 2021, सकाळी 10.24 वाजता

Advertisement

▪️ कन्फर्म कोरोना रुग्ण – 1,24,85,448
▪️ सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण – 6,88,456
▪️ कोरोनामुक्त रुग्ण – 1,16,27,415
▪️ एकूण मृत्यू – 1,64,660


🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement