येत्या 9 एप्रिल पासून IPL चा 14 वा हंगाम सुरू होत आहे. परंतु, कोरोनाची दुसरी लाट आणि उच्चांकी वाढत असलेली रुग्णसंख्या यामुळे क्रिकेट रसिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
म्हणूनच खेळाडूंच्या आरोग्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून BCCI सर्वच खेळाडूंना लस देण्याचा विचार करत आहे. याविषयी BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माहिती दिली
महिनाभराआधी खेळाडूंना कोरोना प्रतिंबधक लस देण्यावर चर्चा झाली होती. मात्र, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगूली यांनी असे काहीही नसल्याचे सांगून सध्यातरी तशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले होते. पण आता कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे बीसीसीआयला आपली भूमिका बदलावी लागण्याची शक्यता आहे.
खेळाडूंच्या काळजीसाठी कोणती तयारी ?
सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बीसीसीआय विशेष काळजी घेत आहे. खेळाडूंना कमीत कमी प्रवास करावा लागावा म्हणून देसभरात पक्त 6 मैदांनावर आयपीएलचे सामने खेळवले जातील.
तसेच, खेळाडूंच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी बायो बबल तयार करण्यात आले आहेत. टीममधील एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झालीच तर त्यासाठी टीममध्ये अतिरिक्त खेळाडूंना ठेवण्यात आलं आहे. तसेच गर्दी होऊ नये म्हणून आयपीएलचे सर्व मॅचेस हे प्रेक्षकांविना खेळवले जातील.
आतापर्यंत 3 खेळाडूंना कोरोना
येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र, यापूर्वीच विविध संघांच्या एकूण 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
कोलकाता नाइटरायडर्सचा खेळाडू नितीश राणा, दिल्ली कॅपिट्लसचा अक्षर पटेल आणि रॉयल चॅलेंजेर्स बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.
याव्यतिरिक्त वानखेड़े स्टेडियमवरील ग्राउंड स्टाफ, चेन्नई सुपर किंग्जचा एक कर्मचारी आणि आयपीएल इव्हेंट मॅनेजमेंटशी निगडीत असलेल्या एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे.
खेळाडूंची रोज कोरोना चाचाणी होण्याची शक्यता
दरम्यान, सध्या 8 संघांपैकी एकूण 5 संघ मुंबईत आहेत. महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे या खेळाडूंना नेमकं कोठे ठेवायचं यावरसुद्धा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
तसेच मुंबईत असणाऱ्या खेळाडूंना कोरोना प्रतिंबधक नियम कठोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीय खेळाडूंची रोज कोरोना चाचणी करणे अनिर्वाय करु शकते. सध्या प्रत्येक तीन दिवसांनी खेळाडूंची कोरोना चाचणी केली जातेय.