मोबाईलप्रेमी लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. महागड्या फोनचे चाहते असाल तर शाओमी कंपनी तुमच्यासाठी खास फीचर्स सहित जबरदस्त फोन लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे.
स्मार्टफोन कंपनी शाओमी हिने एम आय 11 सीरिज सुरु केली आहे. या सीरिजमध्ये एम आय 11 अल्ट्रा प्रो आणि लाईट असे फाईव्ह जी स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. हा फोन भारतातही लवकरच दाखल होणार असल्याची बातमी आता पुढे येत आहे. भारतात येण्यापूर्वीच एम आय 11 अल्ट्रा फोनची किंमत लिक झाली आहे.
भारतीय बाजारात 70 हजार इतक्या किंमतीने हा फोन लाँच होईल. सॅमसंगशी आणि आयफोन शी किंमतीच्या बाबतीत हा फोन स्पर्धा करेल असा अंदाज किंमतीवरून येत आहे.
शाओमी एम आय 11 अल्ट्राची वैशिष्ट्ये
◼️6.81 इंची 2K WQHD+ डिस्प्ले
◼️रिझोल्युशन 3200×1440 पिक्सेल
◼️गोरिला ग्लास प्रोटेक्शन
◼️अँड्रॉइड बेस्ड MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टीम
◼️क्वाल्कम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर
◼️12 जीबी रॅम, 512 जीबी इंटर्नल स्टोरेज
◼️एम आय 11 अल्ट्रा ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या पर्यायात उपलब्ध
कॅमेरा वैशिष्ट्ये
◼️ट्रिपल लेयर कॅमेरा सेटअप
◼️प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन सह 50 मेगापिक्सेल सॅमसंग GN वाईड-अँगल सेन्सर
◼️लेन्स 48 मेगापिक्सेल सोनी IMX586 अल्ट्रा वाईड अँगल, टेली कॅमेरा सेन्सर
◼️5000mAh बॅटरी, 67W चार्जर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs