SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लहान मुलांमध्ये का वाढतोय कोरोनाचा धोका? जाणून घ्या कारण

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच कोरोना संसर्ग हळूहळू देशभरात पुन्हा नव्याने वाढायला सुरुवात झाली. ही देशातली दुसरी लाट असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रासह 18 राज्यांमध्ये कोरोनाचे विविध रूपे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या नवीन स्ट्रेन्समुळे वेगवेगळी लक्षणे देखील समोर येत आहेत. लक्षणांबरोबरच लागण होणाऱ्या वयोगटांमध्ये देखील बदल झालेले पाहायला मिळत आहेत.

Advertisement

मागच्या लाटेमध्ये वृद्ध लोकांना काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. तसे या दुसऱ्या लाटेमध्ये सहव्याधी रुग्ण आणि त्याच बरोबर 20 वर्षांखालील लोक यांना काळजी घेण्याची गरज आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये हा वयोगट 20 ते 45 वर्षांमध्ये परावर्तित झालेला आहे. या वयोगटात लागण मोठ्या प्रमाणात आहे, मात्र 10 ते 20 वर्षातील लोकांना कोरोनाने आपले जीव गमवावे लागल्याच्या अनेक केसेस समोर येताना महाराष्ट्रातून दिसत आहेत.

Advertisement

गेल्या एक दीड महिन्याच्या काळामध्ये 20 वर्षाच्या खालील वयोगटातील किशोरवयीन आणि लहान मुलांना कोरोनाची लागण झपाट्याने झाल्याचे चित्र समोर दिसत आहे. वेळोवेळी केलेला हलगर्जीपणा, त्याचबरोबर गर्दीमध्ये लहान मुलांना नेणे, बाहेर जाताना पालकांनी न घेतलेल्या काळजीमुळे मुलांना कोरोनाची लागण, अशी अनेक कारणे समोर येत आहेत.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा डबल व्हेरीएंट आढळून आल्याने खळबळ माजली आहे. डबल व्हेरीएंट म्हणजे कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या स्ट्रेन ची एका व्यक्तीला लागण होणे. याने उपाय करणे कठीण होऊन बसते. सर्वत्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दुसऱ्या लाटेत संसर्गाचा धोका मोठा आहे.

Advertisement

लहान मुले स्वतःहून बाहेर पडत नाहीत.पहिल्या लाटेत ते घरातच होते. म्हणून सुरक्षित होते. यावेळी लक्षणे न दिसता लोक पॉझिटिव्ह निघत आहेत. अशाच प्रकारे कामासाठी बाहेर पडणारे आई वडील जर लक्षणे नसल्याचे निदान होऊन पॉझिटिव्ह आले तर मुलांना धोका संभवतो.

निष्काळजीपणा, कोरोनाला हलक्यात घेणे, गांभीर्याने सूचना न पाळणे या सर्व गोष्टी आता आपल्याच पायावर कुर्हाड म्हणून पडणार आहेत. सर्वांनीच आपली पुढची पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी जेवढे शक्य आहे तेवढे घरात राहणे योग्य! आणि बाहेर जावेच लागले तर काळजीपूर्वक राहून घरी लवकर परतून सॅनिटाइझ करणे सोयीचे आहे.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement