SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ शनिवार, 03 एप्रिल 2021

मेष : मानसिक त्रास जाणवेल. वाताचे त्रास संभवतात. अनाठायी चिडचिड वाढू शकते. फार हट्टीपणा करू नका. हजरजबाबीपणे वागाल. कमिशनच्या कामातून लाभ संभवतो. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात रूजेल.

Advertisement

वृषभ : तुमच्या मनातील आशा पल्लवित होतील. मित्रांची मदत घ्यावीच लागेल. काही कामात अनाठायी अडकून पडाल. पत्नीची उत्तम साथ लाभेल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत.

मिथुन : बौद्धिक थकवा जाणवेल. उगाचच नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका. कुटुंबियांचे प्रश्न जाणून घ्यावेत. गप्पांच्या ओघात जबाबदारी घेऊ नका. हस्त कलेला उठाव मिळेल. रागावर नियंत्रण ठेवावे.

Advertisement

कर्क : तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. राजकारणी व्यक्तींची गाठ पडेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. फसवणुकीपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात पडू नका.

सिंह : व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जवळच्या लोकांच्या आनंदात सहभागी व्हाल. कौटुंबिक खर्चाचा आवाका लक्षात घ्यावा. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. डोळ्याची वेळोवेळी काळजी घ्यावी.

Advertisement

कन्या : चंचलतेवर मात करावी आणि शांत राहावे. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात घाई करून चालणार नाही. मनातील अनामिक चिंता दूर साराव्यात. वेळेचे योग्य नियोजन करावे. अडथळ्यातून मार्ग काढावा.

तूळ : मुलांशी लहान-सहान गोष्टीवरून कुरबुर होऊ शकते. खर्चाचे भान ठेवावे लागेल. पित्ताचा त्रास जाणवेल. आरोग्य सांभाळा. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. हातातील अधिकार वापरता येतील.

Advertisement

वृश्चिक : कोणाच्याच भांडणात सहभाग नोंदवू नका, अंगलट येईल. मागचा-पुढचा नीट विचार करावा. उतावीळपणे वागू नका. आवाक्याबाहेर खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक कार्यक्रम काढले जातील.

धनु : तुमचा कामातील रस वाढेल. आपले उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. आपलेच म्हणणे खरे ठरवाल तरच फायदा होईल. लहान प्रवासाचा आनंद लुटाल. काही जुनी कामे आज होतील. आर्थिक दर्जा सुधारेल.

Advertisement

मकर : कामे खिळून पडतील. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. वादाचा मुद्दा टाळावा. सामाजिक कार्यात ओढ राहील. कामाची दगदग वाढेल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

कुंभ : मनात प्रबळ इच्छा जागृत होईल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा, त्याने लाभ होईल. क्षणिक आनंदाचा लाभ होईल. उडद्योगवाढीच्या दृष्टीने चांगला दिवस आहे.

Advertisement

मीन : वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. तडफदारपणे, निडर वागणे ठेवाल. कामे जलद गतीने उरकाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल. सर्वांना आनंदाने समजून घ्याल. नवीन मित्र जोडाल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement