SpreadIt News | Digital Newspaper

भारतीय बाजारात ‘या’ पाच कार आहेत टॉपवर

0

भारतीय बाजारातील वाहनांची विक्री पहिल्या तीन महिन्यात चांगली झाली. त्यामुळे शेअर बाजारालाही बळ मिळाले. ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या बूम आहे. महिनाभरात 3,20,487 प्रवासी वाहनांची विक्री झाली.

गेल्या वर्षीच्या लॉकडाउनने बाजाराची पार वाट लागली होती. आता हे सेक्टर सावरत आहे. सर्वच वाहनांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परंतु त्यातल्या त्यात पाच कंपन्यांच्या मोटारींना चांगलीच मागणी आहे. नेमक्या कोणत्या टॉप फाईव्ह कार आहेत, हे पाहूया.

Advertisement

मारुती सुझुकी स्विफ्ट : मारुती सुझुकी ही सर्वात मोठी वाहन उत्पादन कंपनी आहे. या कंपनीची स्विफ्ट पुन्हा एकदा टॉपवर आली आहे. ही कार भारतीयांच्या फार जिव्हाळ्याची आहे. महिनाभरात तब्बल 21,714 कारची विक्री झाली. फेब्रुवारीत हा आकडा 18.696 होता. दणकट आणि मायलेजमध्ये चांगली असल्याने भारतीय ग्राहक तिला पसंती देतात.

मारुती सुझुकी Baleno : मारुती सुझुकीचीच Baleno धुम्माट धावतेय. विक्रीच्या बाबतीत ती देशात दुसरी आलीय. मागच्या मार्च महिन्यात कंपनीने 21,217 कारची विक्री झाली. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत ही आकडेवारी उजवीच आहे.

Advertisement

मारुती सुझुकी WagonR : तिसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकीची WagonR आहे. या कंपनीने 18,757 कार विकल्या. फेब्रुवारी महिन्यात ही आकडेवारी 28,728 होती. अजूनही या वाहनाला चांगली मागणी आहे. मोठी फॅमिली असेल तर ही वाहने घेणे पसंत करतात.

मारुती सुझुकी Alto : चौथा क्रमांकही मारुतीच्याच अल्टोने पटकावलाय. शेवटच्या महिन्यात 17,401 मोटारी विकल्या गेल्या. 16,919 वाहने फेब्रुवारीत विकली होती.

Advertisement

क्रेटा : ह्युंदाय कंपनीची क्रेटा आहे पाचव्या क्रमांकावर. तिच्या 12,640 कार विकल्या आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये हा आकडा 12,428 युनिट होता. एकंदर सर्वाधिक कार विक्रीत मारूती कंपनी सर्वाधिक पुढे आहे. या कंपनीच्या कार भारतीय लोकांना फार आवडतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

 

Advertisement