SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📌 महत्वाच्या घडामोडींचा सखोल आढावा

◼️ लॉकडाऊनला पर्याय सुचवा म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतली वृत्तपत्र संपादकांसोबत महत्वाची बैठक; सुचवलेल्या विविध पर्यायांचा विचार करून नंतर लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

◼️”ममता बॅनर्जींना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा पश्चात्ताप होतो आहे. तृणमूल काँग्रेसमधले लोकं सांगतात की ममता बॅनर्जींनी रागात नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी ही सर्वात मोठी चूक केली आहे”, असे म्हणत नरेंद्र मोदींची ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका

Advertisement

◼️”पत्नी दवाखान्यात ऍडमिट, पुत्र आदित्य कोव्हिडशी दोन हात करतायत, स्वतःच्या हृदयात स्टेनची समस्या तरीही महाराष्ट्र संभाळतायत… टिका करणे सोपे उद्धव ठाकरे होणे अवघड”, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांसाठी भावनिक पोस्ट

◼️मुंब्रा येथे बंद असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये पालिकेचा भ्रष्टाचार; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Advertisement

◼️’कोरोनाच्या लढाईत तुमची साथ हवी’, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला जिम मालकांचा पाठिंबा; कोरोना काळात महाराष्ट्र अडचणीत असताना सरकारच्या निर्णयात पाठीशी असू असे आश्वासन!

◼️’माझा होशील ना मालिकेत’ होणार आदित्यच्या व्हिलन काकाची एन्ट्री, सई-आदित्यच्या सुखी संसारात अतुल परचुरे व्हिलन बनून टाकणार मिठाचा खडा

Advertisement

◼️मार्चमध्ये महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 55 हजारांहून अधिक 20 वर्षाखालील मुलांना कोरोनाची लागण; भाजप खासदार मनोज कोटक यांची माहिती

◼️’राज्यात पुन्हा लॉकडाऊन नको’, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज ची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती!

Advertisement

◼️आयपीएल आधीच दिल्ली कॅपिटल ला मोठा झटका; ऑलराउंडर अक्षर पटेल कोरोनाग्रस्त!

◼️कामाच्या अतिरिक्त ताणापासून मुक्त होण्यासाठी LinkedIn आपल्या जगभरातील 15,900 कर्मचाऱ्यांना एक आठवड्यासाठी देणार पगारी रजा

Advertisement