SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चला, पहिले ते आठवीपर्यंतचे सगळेच पास, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना राज्यभर ती कशी रोखायची यावर विचार मंथन सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक केले आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन सुद्धा सुरु आहे.

लवकरच, महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण क्षेत्राला मागील वर्षभरात सोसावे लागलेले नुकसान, याचा विचार करता यावर्षी नेमके काय होणार? हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला होता.

Advertisement

केवळ दहावी-बारावी नाही तर दहावीच्या आतील विद्यार्थ्यांच्या परीक्षण बद्दल कोणता निर्णय घेतला जाईल, यावरही प्रश्नचिन्ह होते. दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत निर्णय झाला. मात्र, पहिली ते आठवी विद्यार्थी ऑनलाईन कधी ऑफलाईन असे शिक्षण घेत होते. त्यांच्या वर्षभराच्या मूल्यमापनाचे काय? हा प्रश्न मात्र कायम होता.

त्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये 20 वर्षांच्या खालील मुलांना धोका जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेणे तरी योग्य आहे का?? असा प्रश्न शिक्षण मंडळाला पडला आणि शिक्षण मंत्र्यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला.

Advertisement

आज त्यांनी तो निर्णय जाहीर केला आणि तो जाहीर करताना त्यांनी असे सांगितले की, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक मूल्यमापन याचा विचार करता या वर्षी शैक्षणिक मूल्यमापन करणे अशक्य आहे. कारण, काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन, काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन अशा प्रकारे शाळा सुरू झाल्या होत्या. त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये याची खबरदारी आम्ही घेतली.

Advertisement

💉 धक्कादायक: मोबाईलवर बोलण्यात गुंग असलेल्या आरोग्यसेविकेने एकाच वेळी महिलेला दिली दोनदा कोराना लस, वाचा काय झाले पुढे 👉 https://bit.ly/3dvIQGf

मात्र, काही ठिकाणी परिस्थिती भयानक असल्याकारणाने शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत आणि याचाच विचार करून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात बसवायचा निर्णय आम्ही घेत आहोत, असे त्यांनी घोषित केले आहे. त्यामुळे आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नसून त्यांना पुढच्या वर्गात पास करून बसवले जाणार आहे.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन 🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement