SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्ही इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड खाताय का? असा ओळखा फरक..

मुंबई : उन्हाळ्यात सर्वाधिक कोणतं फळ खाल्लं जात असेल तर ते असतं कलिंगड. त्या खालोखाल फळांचा राजा म्हणजेच आंबा असतो. कलिंगड आरोग्यवर्धक तर असतंच, त्याशिवाय ते वजनही कमी करतं. त्यात ९२ टक्के पाणी आणि ६ टक्के साखर असते. परंतु ही फळं नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली असतातच असं नाही. ती लवकरात लवकर विक्रीस यावी यासाठी काही महाभाग त्याला इंजेक्शन देतात.

त्यामुळे त्यात लाली येते. आणि लाल कलिंगड म्हणजे चांगलंच असतं, असा प्रत्येकाला वाटतं. परंतु अजानतेपणे तशी फळं खाल्ली तर शरीराची नक्कीच हानी होते, हे सांगायला डॉक्टरची गरच नाही. ही केमिकलने पिकवलेली फळं ओळखायची कसं, हा प्रश्न आहे. त्याविषयीच आम्ही काही तुम्ही टिप्स तुम्हाला सांगू इच्छितो. त्याचे पालन केलं तर तुम्ही नक्कीच केमिकलचे कलिंगड किंवा आंबा ओळखू शकता.

Advertisement

असं वापरलं जातं केमिकल : 
कलिंगडात लालपणा येण्यासाठी ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन मारलं जातं. त्यासाठी नायट्रोजनचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. क्रोमेट, मेथनॉल यलो, सुडान रेड या केमिकल्स वापरून कलिंगड लाल केलं जाते.

कार्बाईड आंबा पिकवण्यासाठीही वापरलं जातं. कलिंगडासाठीही त्याचा वापर केला जातो. तशी फळं खाल्ल्याने लिव्हर, किडनी बाद करण्यासाठी ते पुरेसं असतं. कॅन्सरची लक्षणं त्याने दिसू शकतात. कधी कधी लैंगिक क्षमताही कमी होते. पचनक्रियाही बिघडते.

Advertisement

अशी करा तपासणी : 
कलिंगडावर पांढरी किंवा पिवळ्या रंगाची पावडर असेल तर ते आजिबात खरेदी करू नका. लवकर कलिंगड पिकवण्यासाठी कार्बाईट टाकतात. विशेषतः लाल रंग येण्यासाठी विक्रेते असे फंडे वापरतात.
इंजेक्शन दिलेल्या कलिंगडात एक मोठी भेग किंवा खड्डा असतो. ते कलिंगड बेचव किंवा केमिकल्ससारखे लागू शकते. तसे असेल तर ते आजिबात खाऊ नका.

सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कलिंगड आणल्यानंतर ते दोन-तीन दिवस तसेच ठेवा. ते खराब झालं नाही तर खाऊ शकता. त्या फळातून पांढरं पाणी बाहेर आलं तर समजायचं, या कलिंगडावर केमिकल्सचा वापर झालाय. अशी फलं बिलकुल खाऊ नका.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement