पुणे – पुणे शहरात कोरोनाची संख्या लक्षणीय आहे. पुणे टॉप फाईव्ह आहे. विशेष म्हणजे पुणे ग्रामीण मधील सात गावे टॉपवर आहेत. तेथील पॉझिटिव्ह रूग्णाचे प्रमाण तेरा टक्क्यांहून अधिक आहे. एकंदरीत शहराजवळ्या गावांनी पुणेकरांना बेजार केलं आहे. ती गावे शेजारील गावांनाही बाधा करीत आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोनाची आकडेवारी जाहीर केलीय. त्यातून हे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात हॉटस्पॉट निश्चित केलेत. या यादीतील दहापैकी सात गावे ही पुणे शहरालगतची आहेत. यात वाघोली, मांजरी बुद्रूक, उरुळीकांचन, नऱ्हे (सर्व ता. हवेली), बावधन, हिंजवडी व सूस (ता. मुळशी) अशी या सात गावांची नावे आहेत. तीन गावांमध्ये शिक्रापूर व रांजणगाव गणपती (दोन्ही ता. शिरूर) आणि मंचर नंबर 1 (ता. आंबेगाव) यांचा नंबर लागतो. या गावांतील लोकांची पुणे शहरात ये-जा असते. इतर गावांतही संपर्क असतो. त्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढते आहे.
हवेलीत 24 हॉटस्पॉट, भोरमध्ये एक, वेल्हे येथे हॉटस्पॉट नाही. दरम्यान, ग्रामीण भागात सध्या 9 हजार 327 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. 2 हजार 421 जण होम क्वारंटाइन आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
टॉप टेन हॉटस्पॉट व रुग्णसंख्या :
– वाघोली — 220
– शिक्रापूर — 156
– हिंजवडी — 130
– उरुळीकांचन — 129
– नऱ्हे — 100
– मांजरी बुद्रूक — 99
– बावधन — 98
– मंचर नंबर १ — 81
– रांजणगाव गणपती — 76
– सूस — 76
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs