महाराष्ट्रात कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या लाईव्ह मध्ये लोक डॉन बाबत कोणता निर्णय घेतात याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती.
साडे आठ वाजता त्यांचे लाईव्ह सुरू झाले. सरकारने केलेल्या विविध कामापासून ते कोरोनाग्रस्त का वाढले यावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. येत्या काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणते निर्बंध असणार आणि काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या!
◼️आधी महाराष्ट्रात चाचणी साठी प्रयोगशाळा मुंबई आणि पुण्यात होत्या आता त्या महाराष्ट्रात 500 आहेत
◼️दरदिवशी 50 हजार मुंबईत चाचण्या
◼️महाराष्ट्रात 1 लाख 82 हजार चाचण्या रोज
◼️सर्व चाचण्यांपैकी 70% आरटीपीसीआर चाचण्या करण्याचा आग्रह, येत्या काळात अडीच लाख चाचण्या होणार
◼️राज्यात रुग्णांच्या देखरेखी बाबत तडजोड किंवा रुग्णसंख्येबाबत लपवाछपवी होणार नाही.
◼️रुग्णसंख्या वाढली तरी घाबरून न जाण्याचं जनतेला आवाहन
◼️कोणीही मला व्हिलन ठरवले तरी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी माझी जबाबदारी मी पार पाडेल असे म्हणत विरोधकांना उत्तर
◼️या काळात लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम वाढल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढला
◼️लॉकडाऊनची शक्यता अजूनही टळली नाही असे सांगत जनतेला केले सावध
◼️रुग्णवाढ होत असताना राजकारण नको
◼️लॉकडाऊन नसेल असे समजू नका, रोजीरोटी महत्वाची मात्र मला जीव वाचवायचे आहेत.
◼️येत्या 2 दिवसात वातावरण पाहून लॉकडाऊन बाबत निर्णय घेणार
◼️उत्सव,सण यावर बंधनं आणावी लागतील
◼️सामाजिक अंतर, अनावश्यक बाहेर फिरणे, प्रवास टाळणे या गोष्टी आपण करू शकतो त्यावरून लॉकडाऊन टाळू शकत नाही का? मग जनता या मार्गाने सहकार्य करू शकते
◼️अर्थचक्र सुधारले तर आरोग्य सुविधा बिघडते आणि आरोग्य पाहिले तर अर्थचक्र बिघडते करायचं काय?
◼️कोरोनाला रोखण्यासाठी रस्त्यावर या, लॉकडाऊन विरोधात नको.
◼️येत्या 2 दिवसात नवी नियमावली लावून राज्य कारभार सुरू होणार
◼️आरोग्य व्यवस्था सुधारा म्हणणाऱ्या उद्योगपतींना ‘आरोग्य व्यवस्था सुधारा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे नाही, डॉक्टर्स आणि नर्सेस कसे वाढवणार?? हा प्रश्न आहेच