नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत वाढ होते, दुसऱ्याच दिवशी ती घसरण होते. एकतर सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. बाजार तर दररोज हिंदोळ्यावर असतो. आता दर आणखी वाढतील की कमी होतील. या गर्तेत सोने खरेदीदार अडकले आहेत.
मागील पाच आणि दहा वर्षांतील सोन्याचा आलेख पाहिला तर कमालीचा चढता आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना सोन्याचे दिवस आले आहेत. गुंतवणूक कशातही असली तरी ती दीर्घकालीन असेल तर चांगले रिटर्न्स मिळतात. एप्रिल, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये सोन्यात प्रचंड नफा मिळतो.
मे महिन्यात सोन्याच्या किंमती थोड्या ढिल्या पडतात. यंदा हेच दर २० टक्क्यांनी खाली आले आहेत. आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला 1 एप्रिल 2021 रोजी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44,701 रुपये होते. ऑगस्ट 2020 मध्ये हीच किंमत 57,008 होती. त्यामुळे एकंदरीत 12,307 रुपये कमी आहे. त्यामुळे हे दर गुंतवणुकीसाठी चांगले मानले जात आहेत.
या महिन्यात होते वाढ
गुंतवणूकदार हुशार असतात. मात्र, गावाकडील लोकांना मार्केटची फारशी माहिती नसते. ते वर्तमानपत्र किंवा सराफ पेढीवाले यांचाच सल्ला घेऊन गुंतवणूक करीत असतात. आतापर्यंतचा आढावा घेतला एप्रिल, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये सोने तेजीत असते. एप्रिल महिन्याचा विचार केला तर साधारणपणे 2.38 टक्के नफा मिळाला. मे महिन्यात 0.16 टक्के तोटा होतो. तेच दर जूनमध्ये चढतात. मागील दहा वर्षात गुंतवणूकदारांना 1.45 टक्के परतावा दिलाय. जुलैमध्ये 1.47 टक्के वाढ होत असल्याचे जाणवते. ऑगस्ट महिना सर्वात फायदेशीर ठरतो. ही सरासरी 6.59 टक्के राहिली आहे.
६३ हजारांचे आले टार्गेट
प्रतितोळा 52,000 ते 53,000 रुपयांचे लक्ष्य गुंतवणूकदारांनी ठेवले आहे. 2021 मध्ये सोनंही 63 हजार रुपयांची पातळी ओलांडू शकेल, असं वाटतं. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतो आहे. त्यामुळे पारंपरिक गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करतात. तसे झाल्यास भाववाढ होऊ शकते.