SpreadIt News | Digital Newspaper

स्कॉर्पिओच्या काचेवरून सचिन वाझे यांचे भांडाफोड; जाणून घ्या पोलिसांना कसा मिळाला पुरावा!

0

गेल्या काही दिवसात पोलीस खात्यामध्ये आणि राजकीय पातळीवर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेले स्फोटकं आणि त्यानंतर सचिन वाझे यांचे झालेले निलंबन आणि एकंदरीत प्रकार चांगलाच गाजत आहे. सचिन वाझे यांनी एवढी शिताफीने प्लॅनिंग करून सुद्धा ते पकडले कसे गेले असा प्रश्न मनात असेल तर त्याचे उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत, सचिन वाझे यांचा भांडाफोड नेमका कसा झाला याबद्दल!

निलंबित अधिकारी सचिन वाझे याच्या अटकेनंतर एकामागे एक नवीन पुरावे एनआयएच्या हाती लागत आहेत. वाझे यांनी विचारही केला नसेल, इतक्या चौकसपणे ही चौकशी सुरू होती आणि तितक्याच शिताफीने एन आय ए देखील या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे.

Advertisement

असे म्हणतात की, गुन्हेगाराने कितीही ठरवले तरी एखादा पुरावा तरी त्याच्याकडून मागे राहतोच आणि तसेच या प्रकरणात झाले आहे.

या तपासात एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारीला अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या स्फोटकाने भरलेली गाडी सापडली आणि ही गाडी अंबानी यांच्या घराबाहेरुन यलो गेट पोलीस स्टेशन परिसरात आणण्यात आली. गुन्हे शाखेचे आणि एटीएसचे सगळे वेगवेगळे पथक तिथे होते.

Advertisement

त्यातील एका अधिकाऱ्याची नजर स्कॉर्पिओ च्या काचेवर पडली. तीच्यावर खूप छोट्या अक्षरात गाडीचा नंबर लिहिलेला होता. या अधिकाऱ्याने त्याचा मूळ फोटो काढला आणि त्यानंतर सिस्टम मध्ये जाऊन गाडी नंबर वरून मूळ मालकाचा शोध घ्यायला सुरुवात केली.

पीटर न्यूटन हा या गाडीचा मूळ मालक असल्याचे रजिस्टर्ड नावावरून लक्षात आले. पोलिस तिकडे पण गेले चौकशीनंतर लक्षात आले की, 3 वर्षांपासून मनसुख हिरेन या व्यक्तीकडे ही गाडी आहे. मग मनसुख यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

Advertisement

त्यांनी ही गाडी 17 फेब्रुवारीला विक्रोळी येथून चोरी झाली आणि स्थानिक पोलिस ठाण्यात 18 फेब्रुवारीला ‘मी तक्रार देखील दिल्याचं’ सांगितलं. यानंतर तपासाचा पथक विक्रोळी पोलिस ठाण्यात पोहोचलं. तिथे एफ आय आर लिहिणारे अधिकारी आणि त्यावेळी उपस्थित असणाऱ्या चौकशी केली गेली. विक्रोळी पोलिसांकडे चौकशी करण्यापूर्वी तपास फक्त स्कॉर्पिओच्या आधारे केला जात होता. मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती स्कॉर्पिओ सचिन यांच्याकडे नोव्हेंबर पासून 5 फेब्रुवारी पर्यंत होती 3 वर्षांपासून मनसुख ही गाडी वापरत होते.

परंतु, तीन वर्षात हिरेन यांना आणि 4 महिन्यात सचिन वाझे यांना गाडीवरच्या काचेला असलेला गाडीचा मूळ क्रमांक दिसला नाही. सचिन वाझे यांनी मूळ गाडीची नंबर प्लेट बदलताना ही बाब लक्षात घेतली नाही आणि इथेच सगळ्या गेमला सुरवात झाली.

Advertisement

जी गाडी चोरी झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती, ती चोरी झालीच नव्हती हे सत्य समोर आले. मनसुख यांनी 17 फेब्रुवारीला रात्री विक्रोळी येथे गाडी पार्क केली आणि त्या ठिकाणाहून कॅब बुक करून ते सीएसटीला आले.

तिथे मर्सिडीज मध्ये बसले आणि सचिन वाझे यांना चावी दिली वाझे यांनी यावेळी त्यांच्या सहकाऱ्याला दिली. विक्रोळीतुन त्या सहकाऱ्याने स्कॉर्पिओ घेऊन ठाण्यातील साकेत बिल्डिंग बाहेर लावली आणि ही गाडी दोन दिवस तिथेच होती. त्यानंतर ती पोलीस मुख्यालयात आणण्यात आली. 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान ही गाडी पोलीस मुख्यालयात पार्क होती.

Advertisement

वाझे यांनी नंतर 25 फेब्रुवारीला स्वतःची गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभी केली नंतर एनोव्हा मध्ये बसून निघून गेले. सचिन वाझे यांच्याच प्लॅननुसार, मनसुख यांनी 18 फेब्रुवारीला विक्रोळी पोलिस ठाण्यात गाडीचा एफ आय आर दाखल करून ती चोरी झाल्याचा बनाव गेला.

पाच किलोमीटरच्या परिसरात जिथे ही गाडी पार्क होती, तिथे सीसीटीव्ही नसल्याने यांचा प्लॅन शिजू शकला. गाडी चोरी झाली तरी, ती चावी तरी मालकाकडे असते. एफआयआर नोंदवताना गाडीची चावी कुठे? हा प्रश्न पोलिसांनी विचारला नाही आणि म्हणून हे सगळे प्रकरण उभे राहू शकले. मनसुख हे काही सराईत गुन्हेगार नव्हते.

Advertisement

त्यामुळे, अधिकाऱ्यांच्या या प्रश्नाने त्यांची भांबेरी उडाली असती आणि जर ते खोटे बोलले असते, तर चावी घरी आहे असे म्हणूनही पोलिसांनी घरातून चावी मिळवण्याचा किंवा जर हे खोटे असेल तर हे सत्य उघड करण्याचा प्रयत्न केला असता.

Advertisement