SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता एटीएम कार्ड नसेल तरीही एटीएममधून पैसे काढता येणार, कसं ते जाणून घ्या..

देशात आणि जगात दिवसेंदिवस तंत्रज्ञानामुळे बँकिंग क्षेत्रात रोज काही न काही बदल होत आहेत. जसं जसं आपण पुढे जाऊ तस तसं बँकिंग क्षेत्रात कमालीचे बदल होतील. म्हणूनच तंत्रज्ञानाच्या जोरावर बँकिंग व्यवहार रोज साधा आणि सोपा होत चालला आहे.

आपण याआधी किंवा सध्या बँक अकाऊंटमधून पैसे काढायचे म्हटलं की, तर एटीएम किंवा बँकेत प्रत्यक्ष जाऊन पासबूकद्वारे पैसे काढावे लागायचे.

Advertisement

याशिवाय आपण मोबाईल बँकिंग, नेटबँकिंग अशा इतर काही सेवा वापरत असलो तरी सध्या आपण एटीएममधून पैसे काढायचे असतील तर गरजेनुसार एटीएम मशीनवर जाऊन ते आधी स्वाईप करावे लागते. मात्र, आता एटीएम कार्ड नसले तरी एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत.

सुरुवातीला ही गोष्ट अवघड वाटेल; पण आता भारतात सध्या एटीएम कार्डविना एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची उत्तम सुविधा हळूहळू येत आहे. तर मग यानंतर या सुविधेद्वारे आता जवळच्या फोनमध्ये असलेल्या यूपीआय अ‌ॅपच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. आहे ना मस्त तंत्रज्ञान!

Advertisement

पैसे कसे काढायचे, सुविधा कधी येणार?

मिळालेल्या माहितीनुसार एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी यूपीआय आयडी असणे गरजेचे आहे.

Advertisement

यूपीआय पेमेंट अ‌ॅपच्या माध्यमातून कोणत्याही एटीएम मशीमधून पैसे काढता येतील. सांगायचंच झालं तर भीम अ‌ॅप, पेटीएम किंवा गूगल पे, फोन पे या यूपीआय अ‌ॅपचा वापर एटीएममधून पैसे काढण्यासाठी होणार आहे. त्यासाठी एटीएम मशीन अद्ययावत केले जात आहे.

एटीएम तयार करणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशनने सांगितल्याप्रमाणे, त्यांनी ICCW म्हणजेच इंट्रोपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल सोल्यूशन लॉंच केले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून यूपीआईच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येतील.

Advertisement

एनसीआरमध्ये यूनियन बँकेने ही सुविधा असणारे खास एटीएम इन्स्टॉल करणे सुरु केले आहे. या बँकेने सध्या 1500 पेक्षा जास्त एटीएम अपग्रेड केले आहेत.

पैसे काढण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या?

Advertisement

तुम्हाला जर एटीएममधून एटीएम कार्डशिवाय पैसे काढायचे असतील तर यूपीआय अ‌ॅप सोबतच यूपीआय आयडी असणे गरजेचे आहे.

अपग्रेड केलेल्या एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढायचे असतील तर आधी एटीएम मशीनकडे जावे लागेल.

Advertisement

त्यानंतर यूपीआय अ‌ॅप्लिकेशनच्या माध्यमातून एटीएमवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर फोनद्वारे कमांड दिल्यानंतर एटीएम मशीममधून पैसे निघतील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement